पाईल्सच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हा असाह्य वेदना असलेला आजार शरीरातील उष्णता वाढल्याने होतो. त्यामुळे पाईल्स असलेल्यांना आपला आहार नेहमीच योग्य तो ठेवावा. आपल्या आहारात आधिक तिखट, तेलकट, खारट पदार्थांचा समावेश होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. चला तर मग जाणून घेऊयात असे कोणते पदार्थ आहेत जे पाईल्स असलेल्या रुग्णांना किंवा पाईल्स होऊ नये म्हणून खाणे टाळावेत.
पाईल्स असलेल्यांनी टाळावे हे पदार्थ
डीप फ्राय, प्रोसेस फूड, फ्रोजन मीट, फास्ट फूड असे पदार्थ पचण्यास बराच वेळ लागतो. यात पोषक तत्व खूप कमी असतात आणि मीठ तसेच अनहेल्दी फॅटचे प्रमाण मात्र अधिक असते.
1. मसालेदार पदार्थ :
अनेकांना मसालेदार पदार्थ खाणे आवडतात. परंतु तुम्हाला पाईल्स असल्याच मसालेदार पदार्थ फार घातक ठरू करतात. पाईल्स असलेल्यांना असा पदार्थांचे सेवन केल्या प्रातविधीवेळी अनेकांना समस्या जाणवतात. अनेकदा रक्तस्त्राव ही होऊ शकतो.
2. अल्कहोल (मद्यपान) :
जर तुम्हाला पाईल्स ची समस्या असेल किंवा तुम्हाला पाईल्सपासून वाचायचे असेल तर मद्यपान टाळणे हा यावरील सर्वात फायदेशीर उपाय आहे. मद्यपान पचनक्रियेला हानिकारक आहे. तसेच डिहायड्रेशनची समस्याही वाढू शकते.
3. दूधाचे पदार्थ :
दूधाच्या पदार्थांचे अति सेवन केल्याने अनेकांना गॅस, पोट कडक होणे अशा समस्या जाणवतात. दूध, पनीर आणि अन्य डेअरी प्रोडक्समुळे पाईल्सची समस्या वाढते. त्यामुळे दिवसभरात दूधाच्या पदार्थांचे तुम्ही किती सेवन करत आहात यावर लक्ष द्या.
4. कच्ची फळे : पाईल्स झाल्यास फळांचे सेवन फायदेशीर ठरते. परंतु ही काळजी घेणे आवश्यक आहे की ही फळे कच्ची तर नाहीत. अर्ध कच्चे फळांचे उदाहरणार्थ कच्च्या केळाचे सेवन केल्यास पोटाच्या समस्या येतात, ज्यामुळे पाईल्सच्या रुग्णांची समस्या वाढते. त्यामुळे चांगल्या पिकलेल्या फळांचेच सेवन करावे.
5. मीठाचे पदार्थ : चिप्स खाणे अनेकांना आवडते. परंतु, हे चिप्स अधिक मीठाचे असल्याने तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. यामुळे रक्त वाहिन्याही प्रभावित होतात. यामुळे शरीराच्या बाकी भागांवरही परिणाम होतो.