पचनाला जड असणाऱ्या, झोप कमी करणाऱ्या पदार्थांना रात्रीच्या जेवणात वर्ज्य करण्यात आलं आहे. जाणून घ्या रात्री झोपताना कोणते पदार्थ खाऊ नये याविषयी –

जास्त तिखट आणि मसालेदार पदार्थ
जास्त तिखट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने रात्री पित्ताची मात्रा वाढू शकते आणि परिणामी पित्त आणि पचनसंस्था बिघडू शकते.

न्यूडल्स
न्यूडल्समध्ये जास्त चरबी आणि कॅलरीज असतात. न्यूडल्स रात्री खाल्ल्यास पचनसंस्थेवर ताण येतो. योग्यप्रकारे रात्री पचन होत नाही.

मिठाई आणि चॉकलेट
रात्री मिठाई किंवा चॉकलेट खाणं हे दातांच्या, झोपेच्या आरोग्यासाठी नुकसानकारक आहे.

पिझ्झा आणि पास्ता
रात्रीच्या वेळी पिझ्झा आणि पास्ता खाणे पचनसंस्थेसाठी हानिकारक आहे. पास्त्यातील कार्बाहायड्रेटमुळे बद्धकोष्ठाचा त्रासही होऊ शकतो.

नॉनव्हेज
नॉनव्हेज पचनासाठी खूप जड असत. रात्री याचं पचन न झाल्यास अनेक रोगांना आमत्रंण ठरू शकतं.

टोमॅटो, आंबट फळे
टोमॅटोमध्ये असणारा टायरामाईन नावाचा घटक मेंदूची कार्यक्षमता वाढवतो. परिणामी लवकर झोप येत नाही. तसेच रात्रीच्या वेळी आंबट पदार्थ खाल्ल्याने पचन व्यवस्थित होत नाही. पित्त आणि छातीत जळजळ होते.

चिप्स
चिप्समध्ये मोनोसोडिअम ग्लूटामेटची मात्रा अधिक असते.यामुळे पचनसंथा बिघडते. झोपेतही बाधा येते.