उन्हाळ्यात वातावरण उष्ण असते त्यामुळे शरीराचे तापमान देखील वाढलेले असते. नॉन व्हेज पदार्थ उन्हळ्यात अति प्रमाणात खाल्ल्याने त्याचे आरोग्यावर परिणाम होतात. जाणून घ्या उन्हळ्यात नॉन व्हेज पदार्थ अति प्रमाणात का खाऊ नयेत –

उन्हाळ्यात नॉन व्हेज पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे शरीरात उष्णता देखील वाढते. नॉन व्हेज मुळात उष्ण असते तसेच ते बनविताना विविध मसाल्यांचा वापर केलेला असतो. परिणामी त्यातील उष्णता आणि तिखटपणा अधिक वाढते. शरीरातील उष्णता वाढल्याने तोंड येणे, त्वचेचे विकार होणे, बद्धकोष्ठता, मूळव्याध,जुलाब,अतिसार यांसारखे त्रास होण्याचे शक्यता असते.

नॉन व्हेज पदार्थांत फायबर्स नसतात, त्यामुळे उन्हाळ्यात अति नॉन व्हेज खाणे कफ वाढवण्यास कारणीभूत होतो.

नॉन-व्हेज पदार्थ पचायला जड असतात. त्यामुळे नॉन-व्हेज पदार्थ खाल्ल्याने उन्हाळ्यात पचनशक्ती मंद होते. त्याचा परिणाम पचन संस्थेवर होतो. त्यामुळे अपचन, पोटात दुखणे, डोकेदुखी जुलाब यांसारखे त्रास होण्याचे शक्यता असते.