निरोगी शरीरासाठी चांगल्या सवयी आणि जागरूकता असणे गरजेचे असते. आहारावरूनही शरीराचे आरोग्य ठरत असते. त्यामुळे जेवनाविषयी योग्य सवयी असाव्यात. जाणून घ्या जेवणानंतर कोणत्या गोष्टी करणे टाळावे याविषयी माहिती –

जेवणानंतर लगेच झोपणे
जेवणानंतर लगेच झोपणे टाळावे. यामुळे पचनक्रियेमध्ये अडथळा येतो. शरीर जडजड वाटते.

अंघोळ
अन्न पचवण्यासाठी भरपूर ऊर्जा आवश्यक आहे, म्हणून रक्ताचा प्रवाह पोटाच्या दिशेने असणे आवश्यक आहे. परंतु अन्न खाल्ल्यानंतर लगेच आंघोळ केल्याने तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागामध्ये रक्त प्रवाह सुरू होतो आणि यामुळे तुमच्या शरीराचे तापमान कमी होते. ज्याचा परिणाम आपल्या पचन प्रक्रियेवर होतो.

चहा, कॉफी
कॉफी, चहामध्ये पॉलीफेनॉल आणि टॅनिन्स सारख्या ग्लायकोकॉलेट्स असतात जे शरीरातून लोह शोषू शकत नाहीत.

व्यायाम
दुपारच्या जेवणानंतर व्यायाम केल्याने तुम्हाला थकवा जाणवेल. व्यायामा ऐवजी थोडेसे चाला.

फळे
फळांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे अन्न सहज पचते. परंतु सहसा आपला आहार जास्त असतो आणि पचण्यास वेळ लागतो. जर तुम्ही जेवणानंतर फळ खाल्ले तर ते खाण्यावरच अडकते आणि पचायला जास्त वेळ लागतो

गोड पदार्थ
अनेक जण जेवणानंतर गोड पदार्थ खातात. जेवल्याने रक्तातील साखर वाढलेली असते. त्यावर गोड खाण्याने ती साखर पडून राहते किंवा पचायला जड जाते. सगळे गोड पदार्थ जेवणाआधी खा.

सिगारेट
सर्वसाधारणपणे जेवण झाल्यानंतर अनेकांना सिगारेट ओढण्याची सवय असते. याचा थेट परिणाम पचनक्रियेवर परिणाम होतो.

पाणी
जेवणानंतर अनेकांना घटाघटा पाणी पिण्याची सवय असते. ही सवय पचनक्रियेवर परिणाम करते. जेवणानंतर साधारण 15-20 मिनिटांनी पाणी प्यायलेलं कधीही चांगलं असतं.