फणसामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, आयर्न, झिंक, आणि पोटॅशिअम हे घटक भरपूर प्रमाणात आढळतात. त्यामुळे फणस खाल्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात. मात्र फणस खाल्यानंतर काही ठराविक पदार्थ खाल्ले तर ते आपल्या शरीराला अपायकारक ठरू शकतात. जाणून घ्या फणस खाल्यानंतर कोणते पदार्थ खाणे टाळावे आणि का टाळावे याविषयी माहिती –

दूध
फणस खाल्यानंतर लगेचच दूध पिले तर दूधातील कॅल्शियम आणि फणसामधील ऑक्सलेट यांतील प्रक्रियेमुळे शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होवू शकतो. यामुळे गॅस, ॲसिडिटी आणि अपचन यांसारख्या तक्रारी उद्भवू शकतात, पचनक्रिया बिघडू शकते.

भेंडी
भेंडीची भाजी फणसासोबत किंवा फणस खाल्ल्यानंतर लगेच खाऊ नये. भेंडीतील घटक आणि फणसातील ऑक्सलेट एकत्र आल्यास आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते.

पपई
फणस खाल्यानंतर लगेचच पपई खाल्ली तर पपईमधील कॅल्शियम आणि फणसामधील ऑक्सलेट नावाच्या रासायनिक घटकाशी रिॲक्ट करतात. त्यामुळे कॅल्शियम ऑक्सलेट तयार होते, ज्याचा शरीरातील कॅल्शियम प्रमाणावर परिणाम होतो. याचा हाडांवर देखील दुष्परिणाम होवू शकतो.

पान
फणस खाल्यानंतर लगेच पान खाल्ले तर पचनक्रियेमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. फणसामधील ऑक्सलेट्स आणि पान या दोन्हीच्या क्रियेमुळे पचनक्रिया मंदावू शकते.

मध
फणसासह मध खाल्ल्यानं शरीरातील साखरेची पातळी लक्षणीय वाढते. यामुळे शरीराला थकवा जाणवू शकतो.