आपल्या आरोग्यासाठी आहार महत्त्वाचा असतो. पोषक तत्वांनी भरलेला आहार आपल्या शरीराला फायदेशीर ठरतो, तर पोषणाची कमी अनेक आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरते. म्हणून फळांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. पण काही फळं रिकाम्या पोटी खाणं टाळलं पाहिजे, कारण यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. (Fruit Side Effect) चला, पाहूया रिकाम्या पोटी कोणती फळं खाणं योग्य नाही.
1. अननस (Pineapple)
अननसात ब्रोमेलेन असतो, जो पोटाला त्रास देऊ शकतो. त्यामुळे रिकाम्या पोटी अननस खाल्ल्यास पोट बिघडू शकते.
2. सफरचंद (apple)
सफरचंद रिकाम्या पोटी खाणं टाळलं पाहिजे. यामध्ये नैसर्गिक अॅसिड आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतात, ज्यामुळे पोट खराब होऊ शकते. अनेकांना रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्यावर अस्वस्थता जाणवते.
3. आंबा (Mango)
फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा देखील रिकाम्या पोटी खाणं टाळा. आंबा खाल्ल्याने सूज, गॅस, आणि बद्धकोष्ठता होऊ शकते. म्हणून, काहीतरी खाल्ल्यानंतरच आंबा खाणं चांगलं.
4. संत्री (orange)
रिकाम्या पोटी संत्री खाणं टाळा. संत्र्यासारखी आंबट फळं अपचन, छातीत जळजळ, आणि ॲसिडिटीला कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे पोटभर जेवल्यानंतरच संत्री खाणं योग्य आहे.
5. पपई (Papaya)
पपई देखील रिकाम्या पोटी खाणं टाळा. यामुळे पचनावर विपरीत परिणाम होऊ शकतो, तसेच पोट फुगण्याची शक्यता असते.
6. पेरु (guava)
पेरु देखील रिकाम्या पोटी खाणं टाळा. यामध्ये फायबर अधिक असल्याने अपचन होण्याची शक्यता असते. पेरु चांगल्या जेवणानंतरच खाणं अधिक योग्य आहे.
( टीप : ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा . माझं आरोग्य या माहितीची जबाबदारी घेत नाही. )