सध्याच्या धावपळीच्या युगात अनेकांजण शरीराकडे दुर्लक्ष करतात. मग त्यांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. दम्याच्या आजारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या आजाराला अस्थमा असंही म्हटलं जातं. परंतु तुम्हाला माहिती आहे का जसे दूषित वातावरणातील घटकांमुळे दम्याचा त्रास वाढतो तसेच तंबाखू, सिगारेट यांसारख्या व्यसनांमुळे तरूणांमध्ये दम्याचा (अस्थमा) त्रास वाढला आहे.
ज्या रूग्णांना दम्याचा त्रास आहे त्यांनी या सवयी सोडाव्यात.
– जे लोक सतत कामात व्यस्त असतात त्यांना दम्याचा त्रास जास्त होतो. त्यामुळे अशा परिस्थितीत कामासोबतच शरीराला विश्रांती देणे आवश्यक आहे. जास्त काम करणे जसं गरजेचं असतं तसंच शरीराला विश्रांतीही गरजेची असते.
– जर तुम्हाला सिगारेटचे व्यसन असेल तर ती सवय आजच सोडा. कारण ही सवय पुढे दम्याचं कारण ठरू शकते.
– ज्या लोकांना दम्याचा आजार आहे त्या लोकांनी रोज शरीराला व्यायाम दिला पाहिजे. त्यासाठी रोज ५०० मीटर चालले पाहिजे.
– जास्त करून बाहेरचं खायची सवय असेल तर त्या सवयी कमी करा. बाहेरच्या फूड खाल्ल्याने दम्याचा त्रास होण्याची शक्यता वाढते.
– दररोज योगा करा.