माझं आरोग्य टीम (Maz Arogya Team) : पोटदुखी असेल तर बेंबीत तेल सोडायला, किंवा लाळ लावायला आपल्या आजीआजोबांनी आपल्याला नेहमीच सांगितले असेल. लहानपणीही डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी तुम्ही हा घरगुती उपायही केला असेल. यामुळे पोटदुखीपासून आपल्याला आरामही मिळाला असेल. बेंबी हा आपल्या शरीराचा केंद्र बिंदू असल्याने केवळ पोट दुखल्यावरच नाही तर रोज रात्री झोपताना तुम्ही तुमच्या नाभीत 2 थेंब तेल टाकले तर त्याचे तुम्हाला निरंतर फायदे पाहायला मिळतील. (Applying oil on Belly Button)

हे ही वाचा ः वजन कमी करण्यासाठी ‘हे’ ड्रिंक आहे अत्यंत गुणकारी

नाभीमध्ये तेल टाकण्याचे फायदे
बेंबी शरीरातील अतिशय लहान भाग असल्याने बेंबीमध्ये अनेकदा घाण जमा होत असते. ती साफ करणेही कठीण असते. अशावेळी बेंबीत तेल टाकल्यास अनेक महिने साचलेली घाणही वितळून स्वच्छ होते. योग आणि आयुर्वेदात असे मानले जाते की शरीराचे चक्र बेंबीपासूनच सुरू होते, म्हणूनच ते संतुलित ठेवण्यासाठी त्यावर तेल लावले जाते. यामुळे मज्जासंस्थाही संतुलित राहते. शिवाय बेंबीत तेल लावल्यास त्वचा उजळते तसेच सांधेदुखीपासूनही सुटका मिळवण्यासही मदत होते.

नाभीत तूप लावण्याचे फायदे –
नाभीमध्ये गाईचे तूप लावून हलकी मालिश केल्यामुळे अनेक फायदे होतात. तूप लावल्यामुळे स्कीनमध्ये आद्रता टिकून राहील आणि फेयरनेस वाढेल. यामुळे पिम्पल्स आणि डाग दूर होतात. बेंबीमध्ये तूप लावल्यामुळे ओठ सुंदर होतात. वजन कमी करायचे असेल तर ऑलिव्ह ऑईल मदत करू शकेल. तसेच हे गुडघेदुखी आणि सांधेदुखी मध्ये फायदेशीर आहे. यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात.

हे ही वाचा ः डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे

(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)