उन्हाळ्यात दही खाणे आरोग्यासाठी लाभदायक असते. आजकाल बाजारातून विकत मिळणारे दही घेण्याकडे सर्वांचा कल असतो. बाजारातील दही शुद्ध असेलच याची खात्री देता येत नाही. परिणामी त्या दह्याच्या शरीराला योग्य फायदा होईलच असे नाही. त्यामुळे घरच्या घरी दही बनवलेले केव्हाही लाभदायक. मात्र अनेकांना घरच्या घरी दही कसे करायचे माहित नसते. खालील टिप्स फॉलो करून घरच्या घरी घट्ट दही लावता येईल. जाणून घ्या दही लावण्याची योग्य पद्धत –
* मातीच्या भांड्यांमध्ये लावलेले दही चांगले लागते. मात्र जर तुमच्याकडे मातीचे भांडे नसेल तर काचेच्या अथवा चिनी मातीच्या भांड्यात तुम्ही दही लावू शकता.
* एक लीटर दूध चांगले तापवून घ्या. नंतर ते थंड करा. दूध खूप थंडही करू नका. थोडेसे कोमट राहू द्या.
मातीच्या, काचेच्या अथवा चिनी मातीच्या भांड्यात दोन चमचे दही (विरजण) टाकून ते भांड्याच्या आतल्या बाजूने पसरून लावा. विरजणासाठी वापरण्यात येणारे दही ताजेच घ्या. ज्या भांड्यांमध्ये दूध गरम करणार असाल त्याच भांड्यात दही लावू नका.
*मातीच्या, काचेच्या अथवा चिनी मातीच्या भांड्यात कोमट दूध टाकून दही आणि दूध चांगले एकत्र करा. रात्रभर व्यवस्थित झाकून ठेवा. सकाळी घट्ट दही तयार होईल. दही तयार झाल्यावर ते लगेच फ्रीजमध्ये ठेवा नाहीतर ते आंबट होण्याची शक्यता असते.
टीप : उन्हाळ्यामध्ये 2 ते 3 दिवसांचे शिळे दही वापरू नका.