उन्हाळ्यात शरीराला थंडावा हवा असतो. त्यासाठी शीतपेये, आईस्क्रीम, कुल्फी खाण्याकडे लोकांचा कल असतो. कृत्रिम पदार्थ वापरून बनविलेली बाजारातील कुल्फी, आईस्क्रीम आणण्यापेक्षा तुम्ही घरगुती पद्धतीने आईस्क्रीम बनवू शकता. जाणून घ्या चिकू कुल्फी बनविण्याची रेसिपी
साहित्य
वाटीभर चिकूचा गर, अर्धी वाटी खवा . १ लिटर दूध, सव्वा वाटी साखर
कृती
दूध आटवून निम्मे करा त्यात साखर घालून उकळवा नंतर थंड होण्यासाठी ठेवा.
खवा आणि चिकूचा गर मिक्सरमध्ये बारीक करू घ्या.
या मिश्रणात गार झालेलं दूध घालून पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घ्या.
तयार झालेले मिश्रण कुल्फीच्या भांड्यात ओतून फ्रिजरमध्ये ठेवून द्या.
५-६ तासानंतर चिकूची कुल्फी तयार होईल.