देशात कोरोना रुग्णसंख्या अद्याप आटोक्यात आलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाने सार्वजनिक हेल्पलाईन सुरू केली आहे. कोरोनाबद्दल असलेल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.
आयुषच्या विविध शाखा-आयुर्वेद, होमियोपॅथी, योग, नैसर्गिक उपचार, युनानी आणि सिद्धचे हेल्पलाईन तज्ञ जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देतील.
14443 असा हा नंबर आहे. या नंबरवर कॉल केल्यास तज्ञ तुम्हाला सल्ला देतील. तसेच जवळ उपलब्ध आयुष सुविधांबाबत माहिती देतील. संपूर्ण देशात सकाळी सहा ते दुपारी 12 पर्यंत सातही दिवस ही सेवा सुरू राहिल.
विशेष म्हणजे ही सेवा मराठी, हिंदी, इंग्रजी याशिवाय इतर भाषांमध्ये उपलब्ध असेल. हेल्पलाईन सुरूवातीला एकाचवेळी 100 कॉले घेईल. नंतर भविष्यात आवश्यकतेनुसार याची क्षमता वाढवण्यात येणार आहे. हा प्रयत्न एनजीओ प्रोजेक्ट स्टेपवनद्वारे समर्थित आहे.