सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेकजण शरीराकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे विविध आजारांनी, समस्यांना सामोरे जावं लागतं. मग यावर उपाय शोधले जातात. परंतु तुम्हाला माहिती आहे का अनेक आजारांवर घरगुती उपाय असतात. चला तर मग जाणून घेऊ
– इंस्टेंट कफ सिरप
सर्दी खोकला हा कोणालाही कधीही अन् केव्हाही होऊ शकतो. परंतु यावर सर्वात सोप्पा उपाय आहे. एक ग्लास कोमट पाण्यात, तीन ते चार थेंब लिंबाचा रस, एक चमचा मध आणि चिमूटभर दालचिनीची पावडर मिसळा. नंतर हे मिश्रण प्या. पाहा झटक्यात तुम्हाला आराम मिळेल.
– डार्क सर्कल्स
डार्क सर्कल्सच्या समस्येनी तुम्ही त्रस्त असाल तर यावर घरगुती उपाय आहे. त्यासाठी फक्त 2-3 थेंब बदामाच्या तेलाचे काही थेंब डोळ्याखाली लावा आणि रात्रभर राहू द्या. तुम्ही फक्त 3-4 दिवस हा उपाय करा. तुम्हाला नक्की फरक जाणवेल.
– मुरूमांची समस्या
बाजारात सध्या यावर अनेक उपाय आहेत. परंतु आधी लोक यासाठी घरगुती उपाय करायचे. तुम्हीही एकदा करून पाहा. 2 चमचे दही घ्या, त्यात अर्धा चमचा मध घाला आणि हे मिश्रण मास्क म्हणून चेहऱ्यावर लावा. आता ते धुवा आणि दोनदा पुन्हा करा.
– सर्दी खोकल्यावर उत्तम उपाय
एक ग्लास गरम पाण्यात जिरे, ठेचलेला गूळ आणि चिमूटभर काळी मिरी मिसळा. हे दिवसातून दोन-तीन वेळा प्या. ते प्यायल्याने सर्दी आणि फ्लू बरा होतो.