अडुळसा हा आरोग्यासाठी बहुगुणी आहे. याची पानं, फुलंचं नाही तर संपूर्ण झाडातच औषधी गुणधर्म आहेत. तसेच या झाडाचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत. अडुळसाचे सेवन केल्याने अनेक आजारांपासून आपले संरक्षण होते.
डोकेदुखी
सतत डोकेदुखीचा त्रास होणाऱ्यांसाठी अडुळसाची पाने खूप गुणकारी आहेत. त्यासाठी अडुळसाची पाने घ्या आणि त्याचा लेप बनवून डोक्यावर लावा. त्यामुळे डोकेदुखी राहते.
श्वसनाचे विकार
अनेकांना श्वसनाच्या विकारांचा त्रास होतो. जसे की दमा, श्वासाच्या समस्या, छातीत साठून राहिलेला कफ याचा त्रास होतो. त्यासाठी अडुळसाचा रस प्यावा. या रसात मध आणि पिंपळीचे चाटण टाकून ते घ्या. त्यामुळे श्वसनाचे विकार दूर होण्यास मदत होते. तसेच दमा लागणे कमी होते.
मुत्रविषयक आजार
सतत लघवी लागणे, लघवीला त्रास होत असेल तर अडुळशाची पाने वाटून त्यात कलिंगडाच्या बिया टाकाव्यात. नंतर त्याचे सेवन करावे.
कफनाशक
अडुळसा कफनाशक आहे. अडुळशाच्या पानांच्या विड्या करून ओढल्यास कफ वितळण्यास मदत होते.
मासिक पाळीच्या समस्या
ज्या महिलांना अनियमित मासिक पाळीची समस्या आहे त्यांनी अडुळसा काढा घ्यावा.
जखम लवकर भरते
अडुळशाची पाने बारीक वाटून ती जखमेवर बांधली असता जखम लवकर भरून येते.
टीप – वरील लेख हा माहितीसाठी दिलेला आहे. वरील उपाय करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. कारण प्रत्येकाची शरीरप्रकृती वेगवेगळी असते यातील उपाय प्रत्येकलाच सूट होतील असं नाही.