केसांच्या समस्या अनेकांना उद्भवतात. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का, केसांच्या सर्व समस्यांवर आपल्या स्वयंपाक घरात यावर एक प्रभावी औषध आहे. ते म्हणजे कढीपत्ता. केसांसाठी याचा वापर कशा पद्धतीने करावा याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे आज आपण याविषयी जाणून घेऊ..
केसगळतीची समस्या
जर तुमचे केस गळत असतील कढीपत्ता आणि खोबरेल तेल एकत्र मिसळा. नंतर ते गरम करा. कढीपत्त्याची पाने काळी होईपर्यंत गरम करा. नंतर थोडं थंड होऊ द्या. मग ते गाळून घट्ट डब्यात ठेवा. आठवड्यातून दोन दिवस हे तेल लावून मालिश करा.
कोंड्याची समस्या
तुम्हाला जर कोंड्याची समस्या असेल तर कढीपत्ता बारीक करून पेस्ट टाळूला लावा. अर्धा तास ते तसेच ठेवा. नंतर साध्या पाण्याने डोके धुवा.
केसांच्या वाढीसाठी
कढीपत्ता, आवळा आणि मेथीचे दाणे घ्या. याची पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट केसांच्या मुळांवर लावा. ही पेस्ट 30 मिनिटे ठेवा. नंतर ती धुवून काढा.
केस पांढरे झाले असतील तर
एका पातेल्यात खोबरेल तेल घ्या. त्यात कढीपत्ता आणि काही मेथीदाणे टाका. ते गरम करा. नंतर हे तेल थंड झाल्यावर गाळून डब्यात ठेवा. आठवड्यातून दोनदा हे मिश्रण लावून मसाज करा. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.