बहुगुणी आवळा सौंदर्यवर्धक, आरोग्यवर्धक तसेच अनेक आजारांवर गुणकारी आहे. व्हिटॅमिन सी स्रोत असणारा आवळा केसांच्या वाढीसाठी आणि केसांना चमकदार बनविण्यासाठी उपयोगी आहे. जाणून घ्या आवळ्यापासून हेअर पॅक तयार करण्याची आणि वापरण्याची पद्धती –

आवळा आणि ऑलिव्ह ऑईलपासून बनविलेला हेयर पॅक

कृती – साधारण २ चमचे आवळा पावडर घ्या.
पेस्ट तयार करण्यासाठी त्यात ऑलिव्ह ऑईल टाका.
मसाज करून टाळू आणि केसांना लावा.
३० मिनिटे केसांवर राहू द्या, नंतर धुवून टाका.

आवळा आणि ऑलिव्ह ऑईल नैसर्गीक कंडिशनर आहेत. ऑलिव्ह ऑईलमध्ये ऑल्युरोपीन असते, जे केस गळणे प्रतिबंधित करते. यात ओमेगा-६ आणि ९ फॅटी ऍसिडसने भरपूर असतात. नवीन केस वाढीसाठी याची मदत होते. आवळ्यातील घटक केसांना चमकदार, दाट आणि निरोगी बनविण्यासाठी मदत करतात.