सुंदर त्वचा सर्वांना हवी असते. यासाठी अनेकजण विविध उपाय करत असतात. परंतु फरक जाणवत नाही. आम्ही तुम्हाला यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत.
ताज्या भाज्या खाव्यात
नैसर्गिक त्वचेसाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तुमचा आहार. आहारात ताजी फळे, हिरव्या भाज्या, भरपूर प्रथिने आणि जीवनसत्त्वे असलेल्या पदार्थांचा समावेश करा.
नियमित व्यायाम करा
आपल्या शरीरासाठी व्यायाम हा महत्त्वाचा असतो. त्याचे अनेक फायदे आहेत. रोज रनिंग केल्याने, योगासने केल्याने रक्तप्रवाह सुरळीत राहतो. तसेच व्यायाम केल्याने चेहऱ्यावर चमक येते.
सनस्क्रीनचा वापर करा
तुम्ही जेव्हा कधी घराबाहेर पडणार असाल तेव्हा सनस्क्रीन लावा. त्यामुळे तुमच्या त्वचेचे धोकादायक UVA आणि UVB किरणांपासून आणि शॉर्ट वेव्ह अल्ट्राव्हायोलेट B (UVB) पासून रक्षण होईल. तुम्ही खरेदी करत असलेल्या सनस्क्रीनवर नॉनकॉमेडोजेनिक किंवा नॉनॅकनेजेनिक किंवा हायफेनेटेड नॉन-अॅक्नेजेनिक असे लिहिलेले असावे.
चेहऱ्याला मध लावा
आठवड्यातून दोनदा चेहऱ्याला मध लावा. मध लावल्यानंतर चेहर 15 मिनिटांनी स्वच्छ करा. मधामुळे त्वचेचा कोरडेपणा जाऊन त्वचेवर नैसर्गिक चमक येते. तसेच त्वचा मऊ बनते.
पुरेशी झोप घ्या
शरीरासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे झोप. शरीरासाठी 7-8 तासांची झोप आवश्यक असते. जर पूर्ण झोप झाली नाही तर शरीर थकलेले दिसते.