पश्चिमोत्तानासन करण्याचे मानसिक आणि शारीरिक विविध फायदे आहेत. या आसनात मानेपासून पायांच्या घोट्यापर्यंतच्या सर्व पाठीमागच्या शरीराच्या भागास ताण मिळतो म्हणून याला पश्चिमोत्तानासन म्हणतात.
आसन करण्याची पद्धती
दोन्ही पाय जमिनीवर सरळ पसरून बसा. दोन्ही पाय एकमेकांना चिकटून ठेवावेत. पाठीचा कणा ताठ ठेवावा.
श्वास घेत दोन्ही हात डोक्यावर ताठ करा.
श्वास सोडत पाठ ताठ ठेवत कंबरेतून पुढे झुका. हनुवटी पावलाकडे न्या. तसेच पावले हाताने पकडण्याचा प्रयत्न करा.
हळूहळू श्वास सोडा. दोन्ही गुडघ्यांना कपाळाचा स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.
खांदे वाकवून कोपराने जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.
थोडा वेळ त्याच स्थितीत राहावे.
हळू हळू हाताची पकड सोडून पूर्वस्थितीत यावे.
पश्चिमोत्तानासन करण्याचे फायदे
खांदे मजबूत होतात.
पचनसंस्था कार्यक्षम होते.
पाठदुखीची समस्या कमी होते.
उच्च रक्तदाबाची समस्या कमी होते.
मन शांत राहते. राग, चिडचिडेपणा कमी होतो.
हाडे लवचिक बनतात.
निद्रानाशाची समस्या दूर होते.
टीप – हे आसन करताना शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त ताण देऊ नका. स्पॉंडिलेसिसच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे आसन करू नये.