ग्लिसरीन हे एकमेव असे ब्युटी प्रॉडक्ट्स आहे, ज्याचा वापर करून केस, त्वचा, पायाच्या टाचा यांची काळजी घेता येते. जाणून घेऊयात ग्लिसरीनचा कसा वापर करावा.
क्लिंजर, टोनर आणि मॉइश्चरायर
त्वचेची काळजी घेण्यासाठी क्लिंजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायजिंग करणे गरजेचे असते ग्लिसरीन क्लिंजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायजर म्हणू वापरता येते. एक चमचा ग्लिसरीन आणि अर्धा चमचा मध मिसळून क्लिंजर बनवता येते. हे क्लिंजर तुम्ही सकाळ संध्याकाळ त्वचेला लावू शकता.
चेहरा स्वच्छ करताना, मेकअप करताना किंवा मेकअप काढताना टोनर लागतो. ग्लिसरीनपासून टोनर बनवता येतो. ग्लिसरीनमध्ये जेवढे ग्लिसरीन आहे तेवढेच पाणी मिक्स करून ते स्पे बॉटलमध्ये भरून ठेवा.
ग्लिसरीन हे एक उत्तम मॉइश्चरायर आहे. कापसाच्या बोळ्यावर ग्लिसरीन घेऊन चेहऱ्यावर लावल्याने चेहरा मॉइश्चराईज होऊन त्वचा चमकदार बनते.
त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते. ग्लिसरीन आणि गुलाबपाणी एकत्र मिसळून लावल्याने ओठ, हात आणि पाय यांचा कोरडेपणा कमी होतो. चेहरा कोरडा पडला असेल तर, ग्लिसरीनमध्ये पाणी मिसळून चेहऱ्याला लावा.
ग्लिसरीनमध्ये साय मिसळून चेहऱ्याला १०-१५ मिनिट लावून नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून टाकावा. यामुळेही चेहऱ्याचा कोरडेपणा कमी होतो.
ग्लिसरीन गुलाब पाण्यामध्ये मिसळून लावल्याने त्वचा हायड्रेट होते त्याशिवाय डेड स्कीन, एजिंग, पिंपल्स यांसारख्या समस्या दूर होतात.
केसांचा कोरडेपणा घालवण्यासाठी
केसांचा कोरडेपणा घालवण्यासाठी ग्लिसरीनचा सिरम म्हणून वापर करता येतो. ग्लिसरीनमध्ये पाणी मिसळून ओल्या केसांना लावा.
टाचांचा रुक्षपणा कमी करण्यासाठी
टाचांचा रुक्षपणा कमी करण्यासाठी रात्री झोपताना टाचांवर ग्लिसरीन आणि लिंबू लावावे.