हिमोग्लोबिन आणि लोहाच्या कमतरतेमुळे थकवा, चक्कर जाणवते. रोजच्या आहारात काही अन्नपदार्थांचा समावेश केला तर रक्तातील लोहाचे प्रमाण वाढून हिमोग्लोबिनची कमतरता भरून निघते.

तुळशीची पाने
तुळशीची पाने नियमित खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिन आणि लोहाची कमतरता भरून निघते.

बीट
शंभर ग्रॅम बीटामधून ०.८ मिलीग्रॅम लोह मिळते. बीटमध्ये व्हिटॅमिन सी आणि लोह घटक मोठ्या प्रमाणात असतात.

पालक
पालक या पालेभाजीमध्ये मोठ्या प्रमाणात लोहाचे प्रमाण असते. शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी पालकचा आहारात समावेश करावा.

चिकन, मटण
आहारात चिकन, मटणचा समावेश केल्याने हिमोग्लोबिन वाढते.

टोमॅटो
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि लोह असते. टोमॅटोच्या नियमित सेवनाने हिमोग्लोबिन तर वाढतेच शिवाय पचनसंस्थाही सुधारते.

पीनट बटर
शेंगदाणे अथवा शेंगदाण्यापासून तयार केलेलं पीनट बटरमुळे रक्तातील लोह वाढते.

खजूर
नियमित खजूर खाल्ल्याने रक्तातील लोहाची कमतरता भरून निघते.

डाळिंब
डाळिंबामुळे तुमच्या शरीराची झीज लवकर भरून निघते. डाळिंबामध्ये लोह, कॅल्शियम, प्रोटिन्स, फायबर आणि इतर अनेक व्हिटॅमिन्स असतात