थंडीपासून बचावासाठी आपण सकाळी सूर्यप्रकाशाची उब घेतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का हा सूर्यप्रकाश आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याचे अनेक फायदे आहेत. आपल्या शरीराला ज्याप्रमाणे अन्न आणि पाणी गरजेचे आहे, त्याप्रमाणे सूर्यप्रकाशही आवश्यक आहे.

रोगप्रतिकार शक्ती वाढते
सूर्यप्रकाशामुळे प्रतिकारशक्ती आणि चयापचय सुधारते. आठवड्यातून 3 ते 4 वेळा सकाळी किमान अर्धा तास उन्हात बसा.

त्वचेच्या संसर्गाचा धोका कमी होतो
सूर्यप्रकाशात असे अनेक चमत्कारी गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीरावर विविध प्रकारच्या त्वचेच्या संसर्गाचा धोका कमी होतो.

लहान मुलांसाठी फायदेशीर
लहान मुलांसाठी सूर्यप्रकाश खूप फायद्याचा आहे. मुलांच्या विकासासाठी हे चांगले आहे.

कर्करोगाचा धोका कमी
जे लोक उन्हात कमी बाहेर जातात, त्यांना कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो, असं संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे सकाळी थोडा वेळ का होईना पण उन्हात बसा. त्यामुळे अनेक आजारांपासून संरक्षण मिळते.

शरीराची हाडे मजबूत होतात
सूर्यामध्ये व्हिटॅमिन-डी असते, ज्यामुळे शरीराची हाडे मजबूत होतात. यामुळे सांधेदुखीची समस्या कमी होते.

चांगल्या झोपेसाठी उपयुक्त
सूर्यप्रकाश घेतल्याने शरीरात मेलाटोनिन हार्मोन तयार होतो. ज्यामुळे शांत झोप लागते.

केवळ ओठांसाठीच नाही लिपबाम गुणकारी, जाणून घ्या इतर सौंदर्यवर्धक उपयोग

घरच्या घरी मेनिक्युअर करून हातांना बनवा मुलायम आणि सुंदर