टाचांना भेगा पडणे ही कॉमन समस्या आहे. परंतु थंडीच्या मोसमात याचा त्रास अधिक जाणवतो. कधीकधी तर याच्या वेदना खूप होतात. कधी सूज आणि वेदनांसोबत रक्त बाहेर येते. यावर काही घरगुती उपाय आहेत ते आपण जाणून घेऊ.

पाय स्वच्छ धुवा-
सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे पाय स्वच्छ करणे. एका टबमध्ये गरम पाणी घ्या. त्यात व्हॅसलीन मिसळा. नंतर कमीत कमी अर्धा तास या पाण्यात पाय टाकून बसा. मग टाचेला ब्रशनं हलक्या हातानं घासून स्वच्छ करा. नंतर कोमट पाण्यानं पाय धुवा आणि एखादी चांगली क्रीम लावा. आठवड्यातून एकदा असं करा.

फुटलेल्या टाचांसाठी खोबरेल तेल
टाचांच्या भेगा पडण्याच्या समस्येवर उपाय म्हणजे कोमट खोबरेल तेल. या तेलानं दररोज भेगा पडलेल्या टाचांना मालिश करा. खोबरेल तेल लावल्यानं आराम मिळेल. महत्त्वाचं म्हणजे रात्री झोपतानाच त्याचा वापर करा. म्हणजे खोबरेल तेल बराच वेळ टाचांवर राहिल

कडुलिंब
भेगा पडलेल्या टाचांवर हा प्रभावी उपाय आहे. त्यासाठी कडुलिंबाची पानं बारीक करून पेस्ट बनवा. तुम्ही त्यात हळदही टाकू शकता. नंतर ही पेस्ट भेगा पडलेल्या टाचांवर लावा आणि कोरडं झाल्यानंतर धुवा.

थंडीत फुटलेल्या टाचांवर घरगुती उपाय
एक केळं बारीक करून ती फुटलेल्या टाचांवर लावा. असं केल्यानं खूप आराम मिळतो आणि टाचा बऱ्या होऊ लागतात. केळीची पेस्ट भेगा पडलेल्या टाचांवर आठ ते दहा दिवस लावल्यानंतर तुम्हाला खूप फरक जाणवेल.