बाजरी शरीरात उष्णता निर्माण करण्याचे काम करते. म्हणून हिवाळ्यात बाजरीची भाकरी अवश्य खावी.
बाजरीच्या भाकरीमध्ये चपातीपेक्षा कॅलरीही कमी असल्याने वजन वाढत नाही.
बाजरीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस घटक आढळतात.
बाजारीच्या भाकरीचे नियमित सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येते. त्यामुळे रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजार कमी होतात.
सर्दीचाही त्रास होत असेल तर बाजरीचे पीठ तव्यावर किंवा विस्तवावर टाकून हुंगावे. सर्दी कमी होते.
बाजरीत तंतुमय घटक अधिक असतात ज्यामुळं पचनक्रिया सुरळीत राहते.
बाजरीची भाकरी खाल्ल्याने हाडे बळकट होतात. रोग प्रतिकारशक्ती वाढते.
स्मरणशक्ती वाढवायचीये मग नियमित खा अक्रोड; जाणून घ्या इतर फायदे