शरीर मजबूत ठेवण्यासाठी आणि कोणत्याही आजाराला दूर ठेवण्यासाठी आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत पाहिजे. त्यासाठी आहारही चांगला हवा. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहारात फळांचा समावेश करा.

संत्री
संत्र्यामध्ये व्हि़टॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स खूप असते. तसेच फायबरही भरपूर असते. त्यामुळे संत्री खा. संत्री खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती अधिक मजबूत होते. शिवाय रक्त शुद्ध राहते.

पेरू
पेरू हे स्वस्त आणि पौष्टिक फळ आहे. पेरूमध्ये संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी असते. पेरू खाल्ल्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढते. तसेच पेरू खाल्ल्यामुळे वजनही कमी होण्यास मदत होते.

पपई
हे फळं केव्हाही आणि कोणत्याही ऋतुत मिळते. पपई खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. तसेच पपई पचनास उपयुक्त आहे. पपईमध्ये व्हिटॅमिन सी कमी प्रमाणात असते. पपई खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते.

डोकेदुखीची कारणे व त्यावरील घरगुती उपाय

हाताच्या त्वचेचा रुक्षपणा आणि कोरडेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय