ऋतुमानानुसार आहारात बदल करणे गरजेचे असते. हिवाळ्यात वातावरण थंड झालेले असते. थंड वातावरण अनेक साथीच्या रोगांसाठी पोषक असते. म्हणून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तसेच शरीराला ऊर्जा, उष्णता देणाऱ्या पदार्थाचा आहारात समावेश करावा. जाणून घ्या हिवाळ्यात कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.
शेंगदाणे
शेंगदाणे खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा आणि उष्णता मिळते. त्यामुळे हिवाळ्यात आहारामध्ये योग्य प्रमाणात समावेश करा.
मोहरी, तीळ
हिवाळ्यात आपल्या मोहरी, तीळ शरीराला उष्णता प्रदान करण्याचं काम करतो. हिवाळ्यात अन्नपदार्थ बनवताना मोहरी किंवा तिळाचा वापर करू शकता. तिळापासून बनवलेले लाडू किंवा चटणी यांचा हिवाळ्यात आहारात समावेश करावा.
तूप
साजूक तूप शरीराला ऊर्जा पुरविण्याचे आणि शरीराची झीज भरून काढण्याचे काम करते. तुपामध्ये फॅटी ऍसिड असते. तूप शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी मदत करते. म्हणून हिवाळ्यात साजूक तूप अवश्य खावे.
आले
हिवाळ्यात भाजी किंवा चहा बनवताना आले टाकत जा. आल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सर्दी, खोकल्यावर आले गुणकारी आहे.
मिरची
तिखट खाण्यामुळे थंडीपासून तुमचा बचाव होऊ शकतो. हिवाळ्यात आहारात मिरचीचा समावेश करा.
सुकामेवा
अंजीर, पिस्ता, बदाम, खजूर, मनुके, काजू यांसारख्या सुकामेवा खाल्ल्याने तुमचे शरीर आतून गरम राहते.
हळद
हळद रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. हळद उष्ण गुणधर्माची तसेच अँटीसेप्टिकही आहे. त्यामुळे हिवाळ्यात हळदीचे दूध प्यावे.
मध
मध हे उष्ण गुणधर्मीय, अँटिसेप्टिक तसेच इम्युनिटी पावर वाढवणारे आहे.
कांदा, लसूण
कांदा, लसूण खाल्ल्यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते. तसेच शरीरात उष्णताही वाढते.
गुळ
हिवाळ्यात सर्दी खोकला यांसारखे साथीचे आजार वाढतात. साथीच्या रोगांपासून बचाव करण्यासाठी गुळ लाभदायक ठरतो. गुळामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम यांसारखे घटक असल्याने थकवा जाणवत नाही.
दालचिनी
दालचिनीमुले शरीराचं मेटाबॉलिज्म वाढतं ज्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. भाजीमध्ये किंवा चहा-काढ्यामध्ये दालचिनीचा वापर करावा.