लसूण आणि मध
लसूण पेस्टमध्ये मध मिक्स करा. हे मिश्रण केसांना लावा. अर्ध्या तासाने केस धुवून टाका.
सोडा
ओल्या केसांना व मुळांना खाण्याचा सोडा चोळा. पंधरा- वीस मिनिटांनी कोमट पाण्याने केस स्वच्छ करा.
लिंबाचा रस
i ) केस धुताना लिंबाचा रस वापरा. शाम्पूने केस धुतल्यानंतर लिंबाच्या रसात थोडे पाणी मिक्स करून केस धुवा.
ii ) लिंबाच्या रसाने केसांना मसाज करा. थोड्या वेळाने केस पाण्याने धुवून टाका. त्यानंतर पुन्हा शाम्पूने केस धुवा.
मुलतानी माती
मेथीची पावडर रात्रभर भिजत ठेवा. यामध्ये मुलतानी माती आणि लिंबाचा रस मिसळून हेयर पॅक बनवून घ्या . हा पॅक केसांना व मुळांना व्यवस्थितपणे लावून घ्या . अर्ध्या तासानंतर केस धुवून टाका. आठवड्यातून हा उपाय एकदा केल्यास कोंड्याच्या समस्येवर नक्कीच फरक जाणवेल.
खोबरेल तेल
खोबरेल तेल , मध , ऑलिव्ह ऑईल आणि दही एकत्र मिसळा. हे मिश्रण केसांच्या त्वचेला लावून 10 मिनिटे मसाज करा. अर्ध्या तासाने केस धुवून टाका.
कोरफडीचा रस
i ) कोरफडीच्या रसाने डोक्याच्या त्वचेला मसाज करावा. अर्ध्या तासाने केस धुवून टाकावेत.
ii ) कोरफडीचा रस , खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईल आणि दही एकत्र करून हेयर पॅक बनवा. हेयर पाक केसांना लावल्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवून टाका.
सफरचंदाचा रस
सफरचंदाचा रस काढा आणि तेवढ्याच प्रमाणात पाणी घेऊन मिश्रण बनवा. हे मिश्रण केसांना लावा आणि 15 मिनिटांनी केस धुवून टाका.
संत्र्याची साल
संत्र्याची साल सुकवून तिची पेस्ट करा त्यात लिंबाचा रस मिसळा आणि केसांना लावा. अर्ध्या तासाने केस स्वच्छ करा. हा उपाय आठवड्यातून दोनदा करा.