फेसवॉश त्वचेवरील घाण, धूळ, पोअर्स स्वच्छ करुन चेहरा फ्रेश आणि तजेलदार ठेवण्यासाठी मदत करते. त्वचेच्या प्रकारानुसार फेसवॉश निवड करावी.
जर तुमची स्कीन सेन्सिटिव्ह असेल तर, कोमट पाण्याचा वापर करावा.
चेहऱ्यावर फेसवॉशचा वापर करण्याआधी हात स्वच्छ धुवून घ्या. यामुळे हातांवर असलेली घाण चेहऱ्यावर लागणार नाही. चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा, त्यानंतरच चेहऱ्यावर फेसवॉश लावा.
फेसवॉश लावून २ मिनिटं चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा आणि कोमट पाण्याने चेहरा धुवा.
चेहरा सारखा आणि जास्त रगडून धुवू नका. त्यामुळे चेहऱ्याला नुकसान पोहचू शकते. चेहरा धुण्यासाठी अति गरम पाणी वापरू नका. गरम पाण्यामुळे चेहऱ्यावर रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. त्यामुळे चेहऱ्याची त्वचा लालसर आणि कोरडी होते. दिवसातून ४ पेक्षा अधिक वेळा फेसवॉशने चेहरा धुवू नये.