नेहमी भरपूर पाणी प्यावे
शरीरात पाण्याची कमतरता झाली की अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे नेहमी भरपूर पाणी प्यावे. शरीरात योग्य प्रमाणात पाणी असेल तर, शरीरही हायड्रेट राहते.
पोषक आहार घ्यावा
ताजी फळ किंवा फळांचा ज्यूस तुमच्या शरीराला एनर्जी देण्याचे काम करतात. आहारात वेगवेगळ्या भाज्या खाव्यात. बटाटा, रताळी, पाव, दूध यांसारखे कार्बोहायड्रेट असणारे पदार्थ आहारात घ्यावेत. भाज्यांमध्ये मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, कॅल्शिअम,आर्यन, व्हिटॅमिन्स, फायबर अँटीऑक्सिडंट असतात. यामुळेही शरीराला एनर्जी मिळते. चिकन, पनीर, मासे, भाज्या यांमधून शरीराला आवश्यक प्रथिने मिळतात. रात्री झोपण्यापूर्वी दुधामध्ये खजूर भिजवून खावे, दूध प्यावे. गुळ आणि शेंगदाणे खा. गुळ आणि शेंगदाणे खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमी दूर होते.
योग्य झोप घ्या
शांत आणि गरजे एवढीच झोप घ्या. जास्त झोपणे ही टाळावे कारण यामुळे आळस तर वाढतो शिवाय डोकेदुखी अंगदुखीही जाणवते.
झेपेल एवढा व्यायाम करा
व्यायामामुळे शरीराला ऊर्जा मिळते. अशक्तपणा जाणवत असेल तरीही झेपेल एवढा व्यायाम जरूर करावा.