स्टेप-१
नखे व्यवस्थित सेट करावीत
सर्वात आधी नख स्वच्छ करावी. त्यासाठी कोमट पाण्यामध्ये शाम्पू किंवा लिंबू आणि मीठ टाकावे. या पाण्यामध्ये ५-१० मिनिट नखे बुडवावीत. त्यानंतर वाढलेली नखे व्यवस्थित कापून सेट करावी. नखांना नेलपेंट असेल तर नेलं रिमुव्हरने नखांवरील नेलपेंट काढावे. तसेच नेल क्युटिकलने नखांतील घाण स्वच्छ करावी.

 

स्टेप-२
स्क्रबिंग
घरगुती स्क्रब हवे असेल तर मध आणि साखर मिक्स करून स्क्रब बनवा. किंवा कोणतेही चांगल्या दर्जाचे स्क्रब घेऊन हातांना २-३ मिनिटे स्क्रब करा. स्क्रब केल्यानंतर हातांना मऊ रुमालाने पुसून घ्या.कापसाच्या सहाय्याने हातांना ग्लिसरीन आणि गुलाब पाणी लावा.

स्टेप-३
मालिश करा
मॉश्चरायझरने ५ मिनिट मालिश करा.

स्टेप-४
पॅक लावा
बेसन पीठ आणि हळद किंवा मुलतानी माती आणि बेसन पीठ मिक्स करून बनवलेला पॅक हातांवर लावा. सुकल्यानंतर थंड पाण्याने धुवून टाकावा.

टॉमेटो खाण्याचे फायदे

रात्री लवकर आणि शांत झोप येण्यासाठी उपाय