लिपस्टिक लावण्याआधी १० मिनिटांपूर्वी लिपबाम लावा.
ग्लॉसी किंवा क्रीमी लिपस्टिक मॅस्कमुळे पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे मॅट फिनिशची लिक्विड लिपस्टिक लावा. कारण ही दीर्घकाळ टिकणारी लिपस्टिक आहे. तसेच ही लिपस्टिक मेकअप रिमूव्हरने काढावी लागते. त्यामुळे मास्क लावला तरी ही लिपस्टिक पुसली जात नाही.
लिपस्टिक मास्कला लागून पसरू नये म्हणून फेस पावडरचा वापर करा. लिपस्टीक लावून झाल्यावर हलक्या हातानं फेस पावडर त्यावर टॅप करा.
सर्वात महत्वाचे म्हणजे चेहऱ्याला मास्क लावण्यापूर्वी लिपस्टिकचा मेकअप व्यवस्थित सेट झाला पाहिजे.