तणावमुक्त जीवन जगण्यासाठी माणसाला स्वतःमध्येच बदल करावे लागतात. कोणी येऊन मदत करील किंवा कोणते औषोधोपचार तणावातून मुक्त करतील यावर अवलंबून राहू नये. कारण या गोष्टींचेही साईड इफेक्ट्स असतात. त्यापेक्षा जीवनशैलीत बदल करावेत. तणाव कमी करण्यासाठी खालील गोष्टींचा अवलंब करा.

भूतकाळातील वाईट गोष्टींचा विचार करू नका.

शरीर सक्रिय ठेवा. त्यासोबत दररोज  व्यायाम करण्याची सवय लावावी. त्यामुळे शरीराची अनावश्यक ऊर्जा बाहेर पडण्यास मदत होईल.

डायरी लिहिण्याची सवय लावा. त्यातून आत्मचिंतन करा.

आपल्या उणीवा दूर करण्याचा प्रयत्न करा.

चुकांमधून शिकण्याची सवय लावा.

काम करत असलेल्या ठिकाणी वातावरण प्रसन्न ठेवा.

नकारात्मक विचारसरणी असणाऱ्या लोकांपासून लांबच रहा.

स्वत:ला नेहमी व्यस्त ठेवा.

नेहमी काहीतरी नवीन शिकत रहा.

योगा, ध्यानधारणा किंवा प्राणायम करा.

स्वतःसाठी वेळ द्या.

आवडते छंद जोपासा. आवडणारी गाणी ऐका. चित्रपट पहा.

एखादे छानसे पुस्तक वाचा.

जीवनातील उद्देश निश्चित करा. त्यादृष्टीने योजना आखा.

काळवंडलेली मान उजळण्यासाठी 5 घरगुती उपाय

चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय