कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते
दह्यामध्ये रक्तातील चरबी घटवण्याची क्षमता असते. यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. त्यामुळे विविध हृदयविकाराची शक्यता कमी होते. रक्तदाब आणि वजनही नियंत्रित राहतो.

दात आणि हाडे मजबूत होतात
दह्यामध्ये फॉस्फरस आणि कॅल्शियम भरपूर असतात. यामुळे आपले दात आणि हाडे मजबूत होतात.

रोगप्रतिकार शक्ती वाढते
दह्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. दह्यामध्ये अधिक प्रमाणात प्रोटीन आणि पौष्टिक घटक असतात. यामुळे शरीर सदृढ बनते. दही अँटिऑक्सिडेंट म्हणून काम करते.

शरीरातील उष्णता कमी होते
नियमित दही खाल्ले तर शरीरातील उष्णता कमी होते.

केसांतील कोंडा कमी करते
केसांमध्ये कोंडा झाला केसांना दही लावून अर्ध्या तासाने केस धुवावे.

पचनशक्ती वाढते
दहीमध्ये लॅक्टोज असते. यामुळे पचनशक्ती वाढते.

केस गळतीवर प्रभावशाली
नियमित दही खाल्ल्याने केस गळती थांबते.

चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात
चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील तर नियमितपणे दही खावे.

रक्तातील हिमोग्लोबिन वाढते
दह्याचे नियमित सेवन केल्याने रक्तातील हिमोग्लोबिन वाढते.

मधुमेहावर नियंत्रण
दह्यामुळे रक्तातील साखरेची पातळी योग्य राखली जाऊन मधुमेह नियंत्रित राखण्यास मदत होते.

सर्दी, खोकला आणि बंद नाक याचा त्रास जाणवतोय? मग करा ‘हे’ घरगुती उपाय