कोरफड (Aloevera) आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन-ए, सी, ई, अमीनो अॅसिड, व्हिटॅमिन बी-१२, फॉलिक अॅसिडचा स्त्रोत आहे. त्यामुळे कोरफडीचा ज्यूस (Aloevera juice) नियमित पिल्याने शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे होतात. कोरफडीचा वापर हजारो वर्षांपासून औषधी, सौंदर्य आणि आरोग्यवर्धक घटक म्हणून होतो. नियमित एलोवेरा ज्यूस पिणं हे केवळ पचन सुधारण्यापुरतं मर्यादित नसून, त्वचा, केस, यकृत, रोगप्रतिकारक शक्ती, वजन नियंत्रण अशा अनेक बाबतीत फायदेशीर ठरतं. जाणून घ्या एलोवेरा ज्यूस नियमित पिण्याचे फायदे (Benefits of Drinking Aloe Juice Regularly) –
पचनसंस्था व्यवस्थित राहते (mproves Digestion)
एलोवेरा ज्यूस नियमित पिल्याने पोटाशी संबंधित समस्या कमी होतात. पचनक्रिया सुरळीत चालते. बद्धकोष्ठ, पाईल्सचा त्रास कमी होतो.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो (Boosts Immunity)
अँटीऑक्सिडंट्सनी भरपूर असलेला एलोवेरा ज्यूस शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतो आणि प्रतिकारशक्ती बळकट करतो.
त्वचेचे आरोग्य सुधारतो (Improves Skin Health)
एलोवेरा त्वचेला उजळपणा देतो, मुरुमं, डाग, कोरडी त्वचा या समस्या कमी होतात.
केसांच्या आरोग्यासाठी गुणकारी (Promotes Hair Health)
एलोवेरा ज्यूस नियमित पिल्याने केस गळती, कोरडेपणा, डोक्याची खवले या समस्या कमी होतात. केस मजबूत आणि चमकदार होतात.
वजन कमी करण्यासाठी गुणकारी (Supports Weight Loss)
कोरफडीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुण भरपूर प्रमाणात असतात आणि त्यामुळे वजन कमी करायला मदत होते. एलोवेरा ज्यूस शरीरात जमलेला मेद वेगाने जाळण्यास मदत करते. शरीरात मेद साठून राहत नाही.
सूज कमी होते, सांधेदुखीचा त्रास कमी होतो (Reduces Inflammation & Joint Pain)
कोरफडमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे एलोवेरा ज्यूस पिल्याने शरीरातील अंतर्गत अवयवांना आलेले सूज कमी होते. तसेच सांधेदुखीचा त्रास कमी होतो.
रक्तदाब नियंत्रणात राहतो (Controls Blood Pressure)
कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण कोरफडीमुळे कमी होतं. कोरफडीचं नियमितपणे सेवन केलं तर त्यांच्या रक्तदाबाची समस्या कमी होते.
मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर (Beneficial for Diabetics)
मधुमेही रुग्णांनी नियमितपणे एलोवेरा ज्यूसचं सेवन केलं तर त्यांना रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यात मदत होते.
कोरडा खोकला कमी होतो (Relieves Dry Cough)
एलोवेरा ज्यूसमध्ये मध मिसळून पिल्याने कोरडा खोकला कमी होतो.
हिरड्यांना आलेली सूज कमी होते (Reduces Gum Inflammation)
एलोवेरा ज्यूस प्यायल्यास हिरड्यांना आलेली सूज कमी होते.