वारंवार पाय सुन्न होतोय? (Feet Feel Numb) हे आहेत आपण अनेकदा असे अनुभवले असेल की अचानकपणे पाय सुन्न होतो, झिणझिणी किंवा मुंग्या आल्यासारखं वाटतं. काही वेळा हा त्रास काही मिनिटांत जातो, तर कधी कधी तो वारंवार होऊन त्रासदायक ठरतो. वैद्यकीय भाषेत याला पारेस्टेशिया (Paresthesia) असे म्हणतात. हे काही गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं, तर कधी कधी फक्त चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळेसुद्धा होऊ शकतं. जाणून घ्या पायांना मुंग्या येण्याची लक्षणं, कारणं आणि घरगुती उपाय –
१. लक्षणे (Symptoms)
पाय सुन्न होणे
मुंग्या आल्यासारखं वाटतं
चालताना किंवा उभं राहताना अशक्तपणा जाणवणे
काही वेळा वेदना किंवा जळजळ होणे
सामान्य कारणे (General Causes)
बराच वेळ एकाच स्थितीत बसणे किंवा पायाखाली पाय ठेवून बसणे
रक्तप्रवाहात अडथळा
पाय किंवा नसा दाबल्या जाणे
वैद्यकीय कारणे (Medical Causes)
मधुमेह
थायरॉईडची समस्या
व्हिटॅमिन B12 ची कमतरता
कंबरदुखीमुळे नसा दाबल्या जाणे (
दमट हवामान किंवा थंडीमुळे नसा आकुंचन पावणे
३. घरगुती उपाय (Home Remedies)
हलकी मसाज करा
पायांची सौम्य मालिश केल्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि सुन्नपणा कमी होतो.
गरम पाण्याच्या पिशवीचा वापर
झिणझिणी किंवा मुंग्या येत असलेल्या भागावर गरम पाण्याची पिशवी ठेवल्यास आराम मिळतो.
तूप
रात्री झोपण्यापूर्वी तूप थोडं कोमट करून घ्या. ते तळपायाला लावा. यामुळे पायाला मुंग्या येण्याची समस्या दूर होईल.
लसूण व सुंठ
सकाळी सुंठीचे काही तुकडे व लसणाच्या २ पाकळ्या चावून खा. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित होतो.
कोमट पाणी आणि मीठ
कोमट पाण्यामध्ये जाड मीठ टाकून त्यात २० ते २५ मिनिट पाय बुडवून बसावे.
व्यायाम आणि स्ट्रेचिंग
दररोज थोडा वेळ चालणे, पायांचे स्ट्रेचिंग करणे आणि योगासनं केल्याने नसा सक्रिय राहतात.
लसूण किंवा हळद दूध
हळदीमध्ये anti-inflammatory गुणधर्म असतात. रात्री झोपण्याआधी हळद दूध घेतल्यास नसा बळकट होतात.
व्हिटॅमिन B12 युक्त आहार
आहारात दूध, अंडी, मांसाहार, साजूक तूप या व्हिटॅमिन B12 युक्त पदार्थांचा समावेश करावा.
शरीराला विश्रांती द्या
अती श्रम टाळा आणि योग्य झोप घेतल्यास नसा ताणतणावमुक्त राहतात.
पिंपळाची पाने
पिंपळाची 3-4 पाने मोहरी तेलात उकळून घ्या. जेव्हा पायाला मुंग्या येतील त्या जागेवर हे तेल लावा.
शरीराची हालचाल करावी
दीर्घकाळ एकच जागी बसणे अथवा उभे राहणे टाळावे. थोड्या थोड्या वेळाने शरीराची हालचाल करत रहावी.
व्यायाम करा
दिनचर्येमध्ये व्यायाम योग यांचा समावेश करावा. मोकळ्या हवेत फिरायला जावे. यामुळे शरीराला अधिक प्रमाणात ऑक्सिन भेटतो तसेच रक्ताभिसरणही सुरळीत राहते.
तेलाने मालिश करणे
रात्री झोपण्यापूर्वी नियमितपणे तळपायाची कोमट खोबरेल तेलाने मालिश करावी. यामुळे पायाच्या नसा मोकळ्या होतात.
शेक द्यावा
मुंग्या आल्यावर गरम पाण्याने किंवा गरम पिशवीने ५-१० मिनिट पाय शेकवावा.
योग्य आहार घ्यावा
आहारामध्ये व्हिटॅमिन बी-१२ चे प्रमाण वाढवावे. त्यासाठी मोड आलेली कडधान्ये, दुग्धजन्य पदार्थ, अंडी पालेभाज्या खाव्यात.
( टीप – वारंवार जर पायाला मुंग्या येत असतील तर वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा. कारण वारंवार पायाला मुंग्या येणे इतरही आजारांचे लक्षण असू शकते. )