दररोज 2-3 अक्रोड खाणे आवश्यक आहे. अक्रोड खाण्याचे अनेक फायदे असले तरी मात्र अक्रोड जास्त प्रमाणात खाऊ नये. यामुळे शरीराचा दाह होतो. जास्त अक्रोड खाल्ल्यास शरीरात उष्णता वाढू शकते, जळजळ, पिंपल्स किंवा अपचन होऊ शकते. जाणून घ्या अक्रोड खाण्याचे अनेक फायदे –
निद्रानाशावर गुणकारी (Beneficial for Insomnia)
अक्रोड खाल्ल्याने मेलाटोनिन नावाचे हार्मोन वाढते जे शांत झोपेस मदत करते. यामुळे निद्रानाश आणि तणावावर नियंत्रण मिळते. मन शांत करण्यासाठी अक्रोड खावे.
मेंदूची कार्यक्षमता वाढवते (Boosts Brain Function)
अक्रोडमध्ये असलेल्या ओमेगा-3 फॅटी ॲसिडस, अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई मुळे मेंदूच्या पेशींचे पोषण होते. स्मरणशक्ती वाढवण्यास मदत होते आणि मेंदू कार्यक्षम राहतो.
सौंदर्यवर्धक अक्रोड (Enhances Beauty)
i) अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई आणि भरपूर प्रमाणात प्रोटिन्स असतात. यामुळे केसांचे आणि त्वचेचे सौंदर्य वाढण्यास मदत होते.
ii) स्कीन स्क्रबसाठी करण्यासाठी अक्रोडचा वापर करतात.
iv) दुधामध्ये अक्रोड पावडर टाकून पेस्ट बनवा. हा फेसपॅक १० ते १५ मिनिटांनी धुवून टाका. यामुळे स्किन फ्रेश आणि चमकदार बनते.
v)चेहऱ्यावरील काळे वांग असणाऱ्यांनी अक्रोड बारीक उगाळून त्याचा लेप चोळून लावावा. काळे वांग कमी होण्यास सुरूवात होते.
उच्च रक्तदाबावर फायदेशीर (Controls High Blood Pressure)
अक्रोड खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. तसेच हृदयविकाराचा धोका खूप कमी होतो.
हृदयाचे आरोग्य सुधारते (Improves Heart Health)
अक्रोडमधील चांगले फॅट्स (मोनोअनसॅचुरेटेड आणि पॉलीअनसॅचुरेटेड फॅट्स) हृदयासाठी फायदेशीर असून, हे रक्तदाब नियंत्रित करण्यात आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
अनेक आजारांवर गुणकारी (Effective Against Multiple Health Issues)
i) अक्रोड खाल्याने कोलेस्ट्रोल कमी होते. त्यामुळे अक्रोडचे सेवन केल्याने रक्तदाब, हृदयरोग आणि इतर काही आजारांचा धोका कमी करण्यास मदत होते.
ii) अक्रोडमधील गुणधर्म रक्तप्रवाह सुरळित ठेवतात.
iii) अक्रोडमुळे रक्तातील साखर वाढत नसल्यामुळे मधुमेहाचा धोका ३० टक्क्यांनी कमी होतो.
iv) अक्रोडमधील अँटी ऑक्सिडन्ट घटक कॅन्सरला दूर ठेवण्यास मदत करतात.
v) जेवणानंतर अक्रोड खाल्याने जेवणाचे पचन व्यवस्थित होण्यास मदत होते.
शरीराला ऊर्जा मिळते (Boosts Energy)
भाजलेले अक्रोड नियमितपणे खाल्याने शरीरातील ताकद वाढण्यास मदत होते.
( टीप – अक्रोड खाण्याचे अनेक फायदे असले तरी मात्र अक्रोड जास्त प्रमाणात खाऊ नये. )