आजकाल वाढते ताणतणाव, प्रदूषण, चुकीचे आहार आणि रसायनयुक्त उत्पादने यामुळे केस गळती ही सामान्य समस्या बनली आहे. केसगळती कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय गुणकारी आहेत. जाणून घ्या केसगळती कमी करण्यासाठी सोपे घरगुती उपाय –
कांद्याचा रस (Onion Juice)
केसांना कांद्याचा रस लावा. अर्धा किंवा एक तासानंतर केस धुऊन टाका. कांद्याच्या रसात भरपूर प्रमाणात सल्फर असते . सल्फर केसांच्या टिश्यूजमधील कॉलेजनची निर्मिती वाढवतात. यामुळे केस तर वाढतात तसेच नवीन केसांचीही निर्मिती होते. हा उपाय आठवड्यातून एकदा करावा.
कोमट तेलाने मसाज करा (Massage with Warm Oil)
डोक्याच्या पृष्ठभागावर कोमट तेलाने मसाज करा. यामुळे रक्ताभिसरणाचा वेग वाढतो तसेच केस मजबूत देखील होतात.
केस जर अति पातळ असतील तर ऑलिव्ह ऑईल वापरा.
खोबरेल तेल आणि आवळा (Coconut Oil with Amla)
खोबरेल तेलात आवळा वाटून मिक्स करा. यामुळे केस गळती थांबते शिवाय केस अकाली पांढरे होत नाहीत.
कोथिंबिरीचा रस (Coriander Juice)
कोथिंबिरीचा रस केसांच्या मुळाशी लावा. यातील पोषक तत्त्वांमुळे केस गळती थांबते तसेच केसांची वाढही चांगली होते.
कॅस्टर ऑईल (Castor Oil)
कॅस्टर ऑईलने केसांना मसाज करा. यामुळे केसांची चमक, मजबूती आणि थिकनेसही वाढते. पंधरा दिवसातून एकदा हा उपाय करा.
प्रोटीनयुक्त आहार घ्या (Eat a Protein-Rich Diet)
केसांना पोषक घटक मिळावेत यासाठी सकस आहार घ्या. दूध, मासे, पनीर यांसारख्या प्रोट्रीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.
आवळा (Amla)
आवळ्यात भरपूर व्हिटॅमिन C असून केसांची मुळे मजबूत होतात. आवळ्याचा रस किंवा पावडर नारळाच्या तेलात मिसळून टाळूवर लावा.
कडीपत्ता (Curry Leaves)
कडीपत्त्यामुळे केसांची वाढ होते आणि गळती थांबते. कडीपत्ता उकळून त्या पाण्याने केस धुणे, किंवा त्याची पेस्ट लावणे फायदेशीर ठरते.
बदाम तेल (Almond Oil)
बदाम तेलात व्हिटॅमिन E असते, जे केसांची मुळे मजबूत करते.
रात्री झोपण्यापूर्वी हलक्या हाताने टाळूवर मालिश करा.