शेंगदाणा लाडू (Peanut laddu) हा पारंपरिक, पौष्टिक आणि चविष्ट गोड पदार्थ आहे. शरीराला तात्काळ ऊर्जा मिळावी म्हणून तसेच उपवासाला देखील हे शेंगदाण्याचे लाडू खाल्ले जातात. पौष्टिक आणि चवीला उत्तम असणारे शेंगदाण्याचे लाडू बनविण्यासाठी फार मेहनतही घ्यावी लागत नाही. शेंगदाणा लाडू खाण्याचे शरीराला भरपूर फायदे मिळतात. जाणून घ्या उपवासाला चालणारे, झटपट बनणारे शेंगदाणा लाडू कसे बनवायचे आणि शेंगदाणा लाडू खाण्याचे फायदे याविषयी माहिती –
पाककृती (Recipe)
साहित्य
पावशेर शेंगदाणे
पावशेर गूळ
( टीप : जेवढे शेंगदाणे घेतले तेवढाच गूळ घ्यावा. तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही गुळाचे प्रमाण कमी देखील करू शकता. )
कृती (Method)
- सर्वात आधी कढईत शेंगदाणे टाकून ते मंद आचेवर खरपूस भाजून घ्यावे.
- भाजलेले शेंगदाणे एका मोठ्या परातीत काढून थंड होऊ द्यावे.
- शेंगदाणे थंड झाल्यावर त्याची साले काढून टाकावीत.
- नंतर चाकूने गुळाचे छोटे तुकडे करावे अथवा गूळ किसून घ्यावा.
- मिक्सरच्या भांड्यात स्वच्छ केलेले शेंगदाणे, थोडा गूळ घालून बारीक करावे. आता हे एकजीव झालेले मिश्रण एका भांड्यात काढा.
- हे मिश्रण चांगले एकजीव करून त्यांचे लगेचच लाडू वळावेत.
शेंगदाणा लाडू खाण्याचे फायदे (Health Benefits of Peanut Ladoo)
रक्तप्रवाह सुरळीत होतो (Improves Blood Circulation)
शेंगदाण्याचे लाडू खाल्ल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो.
त्वचा तरुण दिसते (Glowing & Youthful Skin)
शेंगदाण्यात प्रोटीन,फायबर,खनिज,व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात आढळून येतात. यामुळे शेंगदाण्याच्या लाडूच्या सेवनाने त्वचा नेहमी तरुण दिसते,चेहऱ्यावर तेज येते आणि चेहरा टवटवीत दिसतो.
सांधेदुखी आणि कंबरदुखीपासुन आराम (Relief from Joint & Back Pain)
शेंगदाण्याचे लाडूचे सेवन केले तर सांधेदुखी आणि कंबरदुखी या समस्यांपासून आराम मिळतो.
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर (Boosts Memory)
शेंगदाण्याचे लाडू खाल्ल्याने बुद्धी तेज होते. शेंगदाण्याचे लाडू स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे.
हिमोग्लोबिन वाढते ( Increases Hemoglobin)
शेंगदाण्याचे लाडू नियमित खाल्ल्याने रक्तातील हिमोग्लोबिन तर वाढते, त्याचबरोबर शरीरात रक्ताचं प्रमाण वाढते.
हाडे मजबूत बनतात (Strengthens Bones)
गूळ आणि शेंगदाणे वापरून तयार केलेला हा लाडू कॅल्शियमचा उत्कृष्ट स्रोत आहेत. शेंगदाण्याचे लाडू नियमित खाल्ल्याने त्यामुळे हाडे मजबूत बनतात.
थकवा दूर होतो (Combats Fatigue)
शरीराला जर एनर्जी मिळवायची असेल तर शेंगदाण्याचे लाडू नक्की खा. ज्यामुळे तुमच्या शरीराला लगेच एनर्जी मिळते. शिवाय थकवा दूर होतो.