जिभेचा रंग (Tongue Color) तुमच्या आरोग्यबद्दल बरीच माहिती देत असतो. आपली जीभ ही आरोग्याचे आरसासारखे काम करते. आपली जीभ साधारणपणे हलकी लाल-गुलाबी असते. जर तुम्हाला त्यात काही असामान्य बदल दिसला तर सावधगिरी बाळगा. जीभेचा रंग, पोत आणि तिच्यावर दिसणारे डाग यावरून शरीरातील अनेक लपलेले आजार ओळखता येतात. चला तर जाणून घेऊया जिभेच्या विविध रंगांचे संकेत.
१. गुलाबी रंगाची जीभ (Healthy Pink Tongue)
गुळगुळीत, स्वच्छ आणि ओलसर, गुलाबी रंगाची जीभ हे आरोग्यपूर्ण स्थितीचे लक्षण आहे. ही जीभ सामान्यतः निरोगी शरीराचे लक्षण असते.
२. पांढऱ्या थराची जीभ (White Coated Tongue)
जिभेवर असलेले पांढरे डाग थ्रश नावाच्या यीस्ट संसर्गाचं लक्षण असू शकते. पाढऱ्या रंगाची जीभ तुमच्या तोंडाचं आरोग्य खराब आणि शरीरात डिहायड्रेडची समस्या दर्शविते.
जर जीभेवर पांढरा थर आढळला, तर ती अन्न पचनाच्या अडचणींचे, फंगल इन्फेक्शन (उदा. थ्रश), किंवा शरीरात विषारी पदार्थ जमा होण्याचे लक्षण असू शकते. जीभेवर पांढरा थर आढळल्यास तात्काळ पाचन सुधारक उपाय करावेत.
३. पिवळी जीभ (Yellow Tongue)
तुमची जीभ फिकट पिवळी असेल तर याचा अर्थ तुम्हाला पचन किंवा पोटाशी संबंधित काही समस्या आहेत. पिवळी जीभ मधुमेह आणि कावीळचे लक्षण देखील असू शकते. तसंच काही प्रकरणांमध्ये हे यकृत किंवा पित्ताशयाच्या समस्या दर्शवते. पचन, धूम्रपान, पित्त वाढणे यांसारख्या कारणांमुळे जीभ पिवळसर होते.
४. लालसर रंगाची जीभ (Red or Strawberry Tongue)
अत्यंत लाल रंगाची जीभ दर्शवते की शरीरात उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. जर तुमच्या जीभेचा रंग लाल असेल तर शरीरात फॉलिक अॅसिड किंवा व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असू शकते. तसंच जिभेचा हा रंग रक्ताशी संबधित विकार दर्शवते. लालसर रंगाची जीभ आढळल्यास बी-कॉम्प्लेक्स सप्लिमेंट्स, पोषणतत्वयुक्त आहार घ्यावा.
५. निळसर किंवा काळसर जीभ (Blue or Purple Tongue)
जांभळा रंग रक्तातील ऑक्सिजनची कमतरता दर्शवतो. श्वसन किंवा हृदयाच्या समस्यांशी संबंधित हे लक्षण आहे. ते सायनोसिसचे लक्षण देखील असू शकतं. जीभ जांभळी दिसल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा. कारण हे अयोग्य रक्तभिसरणाचं लक्षण आहे.
६. फिकट किंवा निस्तेज जीभ (Pale Tongue)
जर जीभ खूप फिकट रंगाची वाटत असेल, तर ती रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता किंवा अॅनिमियाचे लक्षण असू शकते. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन रक्त तपासणी करणे आवश्यक आहे
७. तपकिरी किंवा काळी जीभ ( (Brown or Black Tongue)
हे कोणत्याही गंभीर स्थितीचे लक्षण नाही. अस्वच्छता, धूम्रपान, कॉफी किंवा चहाचे जास्त सेवन किंवा अॅंटिबायोटिक्स जास्त वापरामुळे जीभ काळी होवू शकते.
८. ठिकठिकाणी फोड असलेली जीभ (Tongue with Sores or Blisters)
जीभेवर फोड, जळजळ किंवा वेदना असल्यास हे व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स, आयर्न यांची कमतरता किंवा अन्नावरची अॅलर्जी असू शकते.
( टीप : जिभेचा रंग हे शरीरातील अंतर्गत स्थितीचे निदान करणारे एक महत्त्वाचे साधन आहे. जीभेमध्ये बदल जाणवताच तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. )