श्रावण महिन्यात (Shravan) मांसाहार (meat) वर्ज्य करतात. यामागे शास्त्रीय कारणं आहेत. ही प्रथा पाळण्यासंदर्भातील आरोग्याला फायदे होतात. कोणते आजार होत नाहीत. जाणून घ्या श्रावण महिन्यात मांसाहार खाणे का टाळावे याविषयी माहिती –
प्रतिकारशक्ती कमी होते (Immunity Drops in Shravan)
श्रावण (Shravan) महिन्यात प्रतिकारशक्ती सर्वात खालच्या पातळीवर येते. या महिन्यात मांसाहारी, (meat )मसालेदार किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती तसेच पचनसंस्थेवर परिणाम होतो कारण ते पचायला जड असतात. आयुर्वेदानुसार श्रावणात सहज पचता येणारे हलके पदार्थ खावेत. म्हणून मांसाहार टाळून फक्त शाकाहारी पदार्थांचे सेवन करावे.
संसर्ग होण्याची अधिक शक्यता (Higher Risk of Infections)
या काळात मांसाहारी पदार्थांना संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते आणि त्यामुळे मानवी शरीरालाही त्रास होऊ शकतो. या ऋतूमध्ये कॉलरा, डेंग्यू, टायफॉइड, पुरळ इत्यादी आजार वाढतात. त्यामुळे श्रावणात मांसाहार करणे टाळतात.
पचनसंस्था कमकुवत (Weakened Digestive System)
वातावरणात हलका पाऊस असतो. यामुळे बुरशी आणि विषाणूंचे संक्रमण वाढू लागते. त्यामुळे मंद चयापचय ते कमकुवत पचनसंस्था, संक्रमणाचा धोका, शरीर अशक्त होणे यांसारख्या गोष्टी होतात.
प्राण्यांचा प्रजनन काळ (Animal Breeding Season)
श्रावण महिना हा सर्व प्राण्यांचा प्रजनन काळ मानला जातो. त्यामुळे श्रावणात मांसाहार करणे टाळतात.
श्रावणात मांसाहार टाळण्याचे फायदे (Health Benefits of Avoiding Meat During Shravan)
रोगप्रतिकारक शक्ती वाढते (Boosts Immunity)
मांसाहारी अन्न वर्ज्य केल्यानंतर आपलं फळे, भाज्या, धान्य, शेंगा, डाळी यांसारखे पौष्टिक पदार्थ खाण्यावर भर दिला तर रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी होतो (Reduces Risk of Heart and Vascular Diseases)
मांसाहारी पदार्थांत चरबीचे प्रमाण जास्त असते. मांसाहार टाळल्याने सॅच्यूरेटेड फॅट्स आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. यामुळे हृदयाचे आरोग्य राखण्यास आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी होण्यास मदत होते.