आजकाल कमी वयातही केस पांढरे होऊ लागले आहेत. पांढरे केस दिसून लागल्यानंतर आपण सगळेच उपचाराच्या मागे लागतो. काही जण पांढरे केस प्लकरने तोडतात किंवा उपटतात. जाणून घेऊयात पांढरे केस तोडणं योग्य की अयोग्य?
पांढरे केस तोडणं टाळावं. त्याऐवजी सहज आणि नैसर्गिक उपायांचा वापर करावा. कारण केस मूळासकट उपटला जातो: त्यामुळे स्काल्पवरील त्वचेला त्रास होऊ शकतो.
केस काढताना त्वचेला सूक्ष्म जखम होते, त्यामुळे बॅक्टेरिया वाढू शकतात.
फॉलिकल डॅमेज होतो, केस वाढण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेला अडथळा निर्माण होतो.
पांढरा केस तोडला तर त्या ठिकाणी अजून पांढरे केस येतात, हा गैरसमज आहे. पण केस तोडल्यामुळे स्काल्पवर परिणाम होतोच.
‘या’ उपायांनी केस पांढरे होणं थांबेल आणि केसांचे आरोग्य सुधारेल (Try These Remedies Instead)
आहारात पोषकमुल्ये वाढवा, ताणतणावावर नियंत्रण ठेवा, शांत झोप घेता येईल या गोष्टींकडे जास्त लक्ष द्या. कारण यामुळे तुमचे केस पांढरे होणं थांबेल आणि केसांचे आरोग्य सुधारेल.