पावसात वातावरणात दमटपणा, ओलावा वाढतो. ज्यामुळे त्वचेवर घाम येण्याचे आणि त्वचा तेलकट होण्याचे प्रमाण वाढते. त्वचेवर बुरशी, तेलकटपणा व मुरुम यासारखे त्रास होऊ शकतात. म्हणूनच, या पावसाळ्यात त्वचेला अधिक काळजीची गरज असते. जाणून घ्या पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी –
मुबलक पाणी प्या (Drink Plenty Of Water)
पावसाळ्यात वातावरण थंड असल्यामुळे तुम्ही पाणी कमी प्रमाणात पिता. ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. पावसाळ्यात मुबलक पाणी प्यावे.
चेहरा दिवसातून २ वेळा धुवा (Wash Your Face Twice a Day)
पावसाळ्यात चेहरा दिवसातून २ वेळा धुवावा. त्वचेला हानिकारक नसणारा फेसवॉश वापरा.
त्वचा कोरडी करा (Keep Your Skin Dry)
स्नानानंतर त्वचा कोरडी पुसा. ओलसरपणा टाळा. ओलाव्यामुळे त्वचेवर खाज, खरूज असे त्वचाविकार होण्याची शक्यता असते. यासाठी त्वचा कोरडी राहिल याची काळजी घ्यायला हवी.
आहार संतुलित ठेवा (Maintain Healthy Diet)
पावसाळ्यात योग्य आणि संतुलित आहारल घ्यायला हवा. कारण तेलकट पदार्थ आणि जंक फूड खाणे टाळा.
क्लिंझिंग (Cleansing)
पावसाळ्यात त्वचेची काळजी घेताना नियमित क्लिंझिग करणे गरजेचे आहे. यासाठी सकाळी उठल्यावर, झोपण्यापूर्वी आणि मेकअप काढल्यावर त्वचेला क्लिंझिंग करावे. क्लिंझिंग प्रॉडक्ट किंवा कच्चे दूध, बटाट्याचा रस, काकडीचा रस वापरून त्वचेला क्लिंझिग करू शकता.
टोनिंग (Toning)
टोनिंग केल्यामुळे तुमच्या त्वचा स्वच्छ होते. पाणी, ग्रीन टी, गुलाबपाणी अथवा काकडीच्या रसाने तुम्ही तुमची त्वचा टोन करू शकता. पाण्याने त्वचा टोन करण्यासाठी एखाद्या स्प्रेच्या बाटलीत साधं पाणी घ्या आणि दिवसभरातून दोन ते तीन वेळी ते तुमच्या चेहऱ्यावर स्प्रे करा.
मॉईस्चराइझिंग (Moisturizing)
मॉश्चराईझ करण्यासाठी तुम्ही बदामाचे तेल अथवा ऑलिव्ह ऑईल लावू शकता. शिवाय यामुळे तुमची त्वचा तेलकट दिसणार नाही.
सनस्क्रीन ( Sunscreen)
पावसाळ्यात घराबाहेर पडताना एखादे चांगल्या दर्जाचे सनस्क्रिन लोशन जरूर लावा. ज्यामुळे त्वचेवर बाहेरील वातावरणाचा दुष्परिणाम होणार नाही.
लिप केअर (Lip Care)
पावसाळ्यातील थंड वातावरणामुळे तुमचे ओठ निस्तेज आणि कोरडे पडू शकतात. यासाठीच पावसाळ्यात ओठांना लिप बाम लावावा.
पायांची काळजी घ्या (Take care of your feet properly)
पावसाळ्यात पाय सतत ओले होतात. ज्यामुळे पायांच्या त्वचेच्या समस्या वाढू शकतात. म्हणूनच घरी आल्यावर पाय स्वच्छ करा आणि कोरडे करा. पायाला फूट क्रीम लावा आणि घरात असताना सॉक्स वापरा.