आजकाल व्यायाम करणाऱ्यांपासून तरुणांपर्यंत अनेक जण प्रोटीन पावडर (Protein Powder) वापरताना दिसतात. वजन वाढवणे, स्नायू बनवणे किंवा फिट दिसण्यासाठी याचे सेवन केले जाते. तसेच खूप जण शरीरातील प्रोटीनची कमतरता पूर्ण करण्यासाठी प्रोटीन पावडरचे सेवन करतात. प्रोटीन पावडर नेहमी वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावी. मात्र, प्रोटीन पावडरचे अति प्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने सेवन केल्यास त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. जाणून घ्या प्रोटीन पावडरचे अति प्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने सेवन केल्यास शरीरावर परिणाम होऊ शकतात. –
शरीराचे संतुलन बिघडू शकते
आपण जेवत असलेल्या अन्नातून आपल्याला जे न्युट्रिशन मिळते ते कमी असले तरी ते शरीराचे संतुलन राखण्यास मदत करते. पण प्रोटीन पावडरच्या सेवनामुळे हे संतुलन बिघडू शकते.
काही प्रोटीन सप्लिमेंट्समध्ये गुप्तपणे स्टिरॉईड मिसळलेले असतात, जे शरीरातील नैसर्गिक हार्मोन्सवर परिणाम करू शकतात.
पोटाचे आरोग्य बिघडू शकते
प्रोटीन पावडरमध्ये मिल्क पावडर आणि अन्य काही एन्झाईम्स असतात. जे पोटाचे आरोग्य बिघडवू शकते.
किडनीवर ताण
अति प्रोटीनमुळे किडनीला अतिरिक्त नायट्रोजन फिल्टर करावा लागतो, ज्यामुळे दीर्घकाळ वापर केल्यास किडनी डॅमेज होऊ शकते.
हृदयाच्या आरोग्यावर परिणाम
काही प्रोटीन पावडरमध्ये कृत्रिम स्वीटनर, ट्रान्स फॅट्स, स्टिरॉईड्स यांचा समावेश असतो, जे हृदयासाठी घातक असतात.
त्वचेवर परिणाम
प्रोटीन पावडरचे सेवन केल्यामुळे त्यात असलेले हार्मोन्स आणि बायोएक्टिव्ह एजंट असतात. ज्याच्या अति सेवनामुळे तुमच्या त्वचेखाली असलेले सीबमचे प्रमाण वाढते. सीबम वाढले की, त्यामुळे त्वचेवर मोठेमोठे पिंपल्स येऊ शकतात.
इन्सुलिनचे प्रमाण वाढू शकते
प्रोटीन पावडरमध्ये असलेली साखर ही शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढवू शकते. ज्यांना डाएबिटीज आहे त्यांनी प्रोटीन पावडरचे सेवन करताना थोडी काळजी घ्यायला हवी.
यकृतावर परिणाम
चुकीची प्रोटीन पावडर वापर आणि अति सेवनामुळे यकृताचे कार्य बिघडू शकते.
टीप : प्रोटीन पावडर नेहमी वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावी.