खूप जणांना गरज नसताना वरुन मीठ खाण्याची सवय असते. सतत वरून मीठ घेऊन खाणे किंवा अती मीठ खाणे हे आरोग्यासाठी खूपच घातक असते. जाणून घ्या मीठ अति खाण्यामुळे नेमके काय होते?
हाडं ठिसूळ होतात
अति मीठ खाणे हे हाडांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असते. मीठाच्या अतिसेवनामुळे व्हिटॅमिन डी शरीरातून कमी होऊ लागते. त्याचा परिणाम हाडं ठिसूळ होऊ लागतात. त्यामुळे अंगदुखी, गुडघेदुखी कालांतराने जाणवू लागते.
रक्तदाब वाढतो
अति मीठ खाल्ल्यामुळे मुळे शरीरात पाणी धरून ठेवले जाते, त्यामुळे रक्तदाब वाढतो.
हात-पाय सुजतात
अति मीठ खाल्ल्यामुळे शरीरात अनावश्यक पाणी साचते, त्यामुळे हात-पाय सुजतात.
त्वचेवर परिणाम
अति मीठ खाल्ल्यामुळे त्वचा कोरडी किंवा रुक्ष होऊ शकते.