उन्हाळ्यामध्ये बेलाच्या फळाचा सरबत पिणे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. जाणून घ्या बेलफळाचा सरबत बनविण्याची रेसिपी
साहित्य
दोन बेलफळे, पाणी, जिरे पावडर, चवीपुरते मीठ आणि चार चमचे साखर
कृती
बेलफळे स्वच्छ धुवून पुसून घ्या. बेलफळे कापून त्यातील गर काढून घ्या.
भांड्यामध्ये हा गर काढून घ्या आणि त्या गराच्या दुप्पट पाणी त्यात मिसळा. गर आणि पाणी एकजीव करा.
मिश्रण एकजीव झाल्यावर एका गाळणीच्या मदतीने ते गाळून घ्या. त्यात साखर टाकून विरघळवून घ्या. साखरेऐवजी गुळाचा वापर केला तरी चालेल.
वरून चवीपुरते मीठ आणि जिरेपावडर टाका.
बेलफळाचे सरबत पिण्याचे फायदे
शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.
इन्स्टंट एनर्जी मिळते.
पचनशक्ती सुधारते. पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
अपचन, बद्धकोष्ठता, मुळव्याधी, पोटदुखी, गॅस होणे या समस्यांपासून मुक्ती मिळते.
शरीरातील अतिरिक्त टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. त्यामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते.