बेलपत्र हे एक औषधी वनस्पती आहे. बेलाचे फळ, मूळ, पान आणि फांद्या यांचा उपयोग औषध बनवण्यासाठी केला जातो. बेल पत्रामध्ये कॅल्शियम आणि फायबर तसेच व्हिटॅमिन ए, सी, बी1 आणि बी6 यासारखे पोषक घटक असतात. जाणून घ्या उपाशीपोटी बेलपत्र खाण्याचे फायदे
हृदयासाठी फायदेशीर
बेलाच्या पानात अँटी ऑक्सिडेंट्स गुण असतात, जे हृदयरोगांपासून बचाव करतात आणि हृदय मजबूत ठेवतात. नियमितपणे बेलाची पानं खाल्ल्यास हृदयासंबंधी अनेक समस्या कमी केल्या जाऊ शकतात.
पोटाच्या समस्यांवर गुणकारी
रोज सकाळी उपाशीपोटी बेलपत्र खाल्ल्यास पोटाच्या समस्यांवर आराम मिळतो.
बेलपत्रामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पचनक्रिया मजबूत करतं.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
बेलपत्रामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
शरीरातील साखर नियंत्रित
बेलाची पानं शरीरातील साखर नियंत्रित ठेवतात.