मधुमेह
सतत भूक लागणं हे मधुमेहातील एक लक्षण आहे. मधुमेहात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे देखील भूक लागू शकते.
प्रोटीनचे प्रमाण कमी होणे
शरीरात प्रोटीनचे प्रमाण कमी असल्यास सारखी भूक लागू शकते.
बुलेमिया
बुलेमिया हा एक इटिंग डिसऑर्डर आहे. यामध्ये रूग्ण अनियमितपणे खातात.
अपुरी झोप
अपुऱ्या झोपेमुळे भुकेचे संकेत देणाऱ्या हार्मोनचं शरीरात प्रमाण वाढून सारखी भूक लागते.
ताणतणाव
ताणतणावामुळे देखील व्यक्तीचे नियमित जेवणाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे देखील सतत खाण्याची इच्छा बळावून त्याचा परिणाम मेंदूवर होतो.
डिप्रेशन
बायपोलर किंवा मॅनिक डिप्रेशन या मनोविकारांमध्ये मेंदूमधल्या केमिकल्समध्ये असतुंलन निर्माण होते. त्यामुळे भूक जास्त लागते.
पोटात जंत होणे
पोटात जंत झाल्यास तुम्हाला सतत भूक लागू शकते.
औषधे
काही औषधांमुळेही सतत भूक वाढते.
रक्तात साखरेची कमतरता
हायपोग्लाइसीमिया या रक्तातील साखरेच्या कमतरता या समस्येमुळे देखील भूक लागण्याचे प्रमाण वाढू शकते.
पीएमएस
पीएमएस म्हणजेच प्रिमेंस्ट्राईल सिंड्रोमच्या समस्येमध्ये सतत भूक लागणं हे लक्षण आढळते.