मकरसंक्रातीच्या आधीच्या दिवसाला भोगी म्हणतात. थंडीत बाजारात अनेक भाज्या उपलब्ध होतात. त्यामुळं या दिवशी सर्व भाज्या एकत्र करुन ही भाजी बनवली जाते. तसंच, या भाजीबरोबर तीळ लावून बाजरीची भाकरी खाल्ली जाते. जाणून घ्या भोगीची भाजी खाण्याचे फायदे benefits of eating bhogi bhaji

credit – google image

पौष्टिक घटक
भोगीच्या भाजीत अनेक पोषकतत्वे आहेत. यात बी जीवनसत्वे, फोलेट, ओमेगा-3 फॅट्स, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि ग्लुटाथिओन सारखे गुणधर्म असतात.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी भोगीची भाजी उपयुक्त आहे. भोगीच्या भाजीमध्ये कमी glycaemic index असतात, यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.

पचनशक्ती सुधारते
भोगीच्या भाजीमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. यामुळे पचनशक्ती सुधारते आणि पचन प्रक्रिया सुरळीत होते.

थंडीत शरीराला ऊर्जा आणि उष्णता मिळते
भोगीच्या भाजीमध्ये थंडीत उपलब्ध होणाऱ्या भाज्यांचा तसेच तीळ, शेंगदाणा, खोबरं या उष्ण पदार्थांचा वापर केला जातो. यामुळे थंडीत शरीराला ऊर्जा आणि उष्णता मिळते.

त्वचेसाठी गुणकारी
भोगीच्या भाजीत अँटीऑक्सिडन्ट्स असतात. त्यामुळे त्वचा निरोगी बनते.

( टीप : वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे.)