हिवाळा सुरु झाला कि काहींना सांधेदुखीचा त्रास सुरु होतो. जाणून घ्या हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढण्याची कारणे आणि उपाय याविषयी माहिती –
हिवाळ्यात रक्ताभिसरण कमी झाल्यामुळे आणि झोपताना त्याच स्थितीत राहिल्याने सांधेदुखीचा त्रास होतो.
थंडीत कमी तापमानामुळे रक्तवाहिन्या आकसतात. त्यामुळे रक्तप्रवाह कमी होऊन सांधेदुखीच्या वेदना अधिक जाणवतात. हिवाळ्यात कमी शारीरिक हालचाल झाल्यामुळे देखील सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो.
हिवाळ्यात शरीर उष्णता टिकवून ठेवण्यासाठी रक्त प्रवाह वेगाने होत असतो. ज्यामुळे सांध्यातील रक्त प्रवाह कमी होतो. उष्णता वाचवण्यासाठी, रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि अरुंद होतात, ज्यामुळे सांध्यातील रक्त परिसंचरण कमी होते. या कमी झालेल्या रक्तप्रवाहामुळे सांध्यांना कमी ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा पुरवठा होतो. त्यामुळे सांधेदुखीचा त्रास होतो.
उपाय
शरीराला उबदार ठेवा
हिवाळ्याच्या काळात शरीराला उबदार ठेवणे हे सांधे समस्या टाळण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे. शरीरातील उष्णता टिकवण्यासाठी उबदार कपडे आणि बूट घाला.
नियमित व्यायाम करावा
हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास होतो, त्यांनी नियमित व्यायाम करावा. यामुळे वेदना आणि वातीपासून आराम मिळतो.
थंडीचा संपर्क टाळा
थंडी टाळण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी घराबाहेर पडू नका.
वजन नियंत्रणात ठेवा
जास्त वजनामुळे सांध्यांवर अतिरिक्त ताण पडतो, त्यामुळे वजन जास्त वाढू देऊ नका.
भरपूर पाणी प्या
बहुतेक लोकांचे पाणी पिण्याचे प्रमाण थंडीत कमी होते. यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. यामुळे सांध्यामध्ये कडकपणा आणि द्रव कमी होऊन वेदना होतात. त्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवणे गरजेचे आहे. शरीर चांगल्या प्रकारे कार्य करत राहण्यासाठी भरपूर पाणी प्या.
पुरेशी झोप घ्या
सांधे निरोगी ठेवण्यासाठी आणि सांधेदुखीची समस्या वाढू नये यासाठी शरीराला पुरेशी विश्रांती देणे आणि दररोज रात्री 6 ते 8 तास झोपणे अत्यंत आवश्यक आहे.