हिवाळ्यामध्ये (winter) शरीराला ऊर्जा प्रदान करण्यासाठी पौष्टिक आहाराबरोबरच प्रथिनेयुक्त फळे देखील मदत करतात. जाणून घ्या थंडीत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी (immunity power) आहारात कोणत्या फळांचा समावेश करावा आणि त्यांचे फायदे याबद्दल माहिती –
सफरचंद (apple)
सफरचंद हे हिवाळ्यात येणारे एक प्रमुख फळ आहे ज्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. सफरचंदांमध्ये अँटीऑक्सिडेंट्स आणि फायटोकेमिकल्स असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते.
पेरू (Guava)
पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, आहारातील फायबर आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास, पचन सुधारण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.
डाळिंब (Pomegranate)
डाळिंब हे व्हिटॅमिन सी आणि बी यांचा चांगला स्रोत आहे. डाळिंबांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, सेलेनियम आणि जस्त असतात.
अशक्तपणा दूर करण्यासाठी डाळिंब गुणकारी आहे. व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी डाळिंबाचा रस पिऊ शकता.
किवी (Kiwi)
किवीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे किवी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि शरीराला रोगांपासून दूर ठेवते.
संत्री (Orange)
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी अत्यावश्यक असतं. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते.
स्ट्रॉबेरी (Strawbery)
अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि फायबरने समृद्ध असलेले हे फळ रोगप्रतिकारक शक्ती, हृदयाचे आरोग्य आणि पचनास मदत करते. स्ट्रॉबेरीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते.