गोकर्णी ही वनस्पती बहुतांशी शोभेची वनस्पती म्हणून लावली जाते. गोकर्णीला अपराजिता असेही म्हणले जाते. घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते असे म्हणतात. निळ्या रंगाची ही फुले दिसायला अगदी मनमोहक असतात. आयुर्वेदामध्ये गोकर्णीच्या फुलाला विशेष महत्व आहे. दिसायला आकर्षक असणारी गोकर्णीची फुले आरोग्यदायीही आहेत. जाणून घ्या गोकर्णीच्या फुलांचे फायदे –
* गोकर्णीच्या फुलांचे फायदे
डोळ्यांसाठी गुणकारी
दृष्टी कमकुवत झाल्यानंतर गोकर्णीच्या फुलांचे पाणी प्यावे. यामुळे बिघडलेली दृष्टी सुधारण्यास मदत होते.तसेच डोळ्यांची नजर सुधारते.
त्वचेसाठी गुणकारी
त्वचेसंबंधित कोणतीही समस्या उद्भवल्यानंतर गोकर्णीच्या फुलांचे पाणी प्यावे. यामुळे त्वचेच्या तक्रारी कमी होण्यास मदत होते.
मानसिक ताणतणावावर गुणकारी
मानसिक ताणतणाव वाढल्यानंतर गोकर्णीच्या फुलाचे पाणी प्यावे. यामुळे तणाव कमी होतो.
नैसर्गिक रंग
गोकर्णीच्या निळ्या फुलांपासून नैसर्गिक रंगदेखील तयार होतो.
गोकर्णीच्या फुलांचा काढा पिण्याचे फायदे
संधिवाताचा त्रास कमी होतो
गोकर्णीच्या फुलांचा काढा नियमित प्यायल्याने संधिवाताचा त्रास उद्भवत नाही. तसेच हाडांच्या दुखण्यावर गोकर्णीचा काढा प्रभावी आहे.
अपचन, पित्ताचा त्रास कमी होतो
गोकर्णीच्या फुलांचा काढा प्यायल्याने अपचन, पित्ताचा त्रास होत नाही.
* असा बनवा गोकर्णीच्या फुलांचा काढा
एक कप पाणी घेऊन त्यात गोकर्णीची ५ ते ६ ताजी फुले टाका आणि हे पाणी उकळवून घ्या. या पाण्याला उकळी आल्यानंतर पाण्याचा रंग बदलण्यास सुरुवात होईल. गोकर्णाचे पाणी निळ्या रंगाचे झाल्यानंतर गॅस बंद करून घ्या. त्यानंतर पाणी गाळून घ्या.
गोकर्णीच्या फुलांचा चहा पिण्याचे फायदे
वजन कमी करण्यास मदत
गोकर्णीच्या फुलांपासून बनवलेल्या चहामध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात.
अनेक आजारांवर गुणकारी
गोकर्णीच्या फुलांपासून बनवलेल्या चहाचे सेवन केल्याने चयापचय वाढतो. त्यामुळे चरबी जाळण्याची प्रक्रिया वेगवान होते. याचे नियमित सेवन केल्यास उच्च रक्तदाब, मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉल यासह अनेक गंभीर समस्यांपासून आराम मिळतो.
चरबी कमी होते
गोकर्णीच्या फुलांपासून बनवलेल्या चहाचे सेवन केल्याने शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी तर कमी होतेच पण चयापचय वाढण्यासही मदत होते.
*असा बनवा गोकर्णीच्या फुलांचा चहा
एका पातेल्यात ५ ते ६ गोकर्णीची फुले एका ग्लास पाण्यात घालून चांगले उकळा. यानंतर पाणी उकळून अर्धे झाल्यावर ते गाळून त्यात लिंबाचा रस किंवा मध टाकून प्यावे.
टीप : वरील माहिती केवळ सामान्य ज्ञानावर आधारित आहे.