हृदयाच्या आरोग्यासाठी कोलेस्ट्रॉलचे प्रमाण Cholesterol level वाढू नये याकडे लक्ष देणे गरजेचे असते. खराब जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या उद्भवू शकते. मात्र जीवनशैलीत काही बदल करून तुम्ही कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवू शकता. जाणून घ्या कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी उपाय –
१. फळे, भाज्या, भरड धान्य आणि डाळी यांचा आहारात समावेश करा.
२. फ्लॉवर, टोमॅटो, मिरची, भाजी, कोशिंबीर, गाजर, पालक आणि कांदा कोलेस्ट्रॉल कमी Cholesterol level करण्यासाठी सर्वात प्रभावी मानले गेले आहे. या भाज्यांमध्ये फायबर आणि प्रथिने असतात, ज्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होऊ शकते.
३. चालणे, जॉगिंग, सायकलिंग किंवा पोहणे यांसारखे व्यायाम करा.
४. धूम्रपान करू नये, धूम्रपान सोडल्याने कोलेस्टेरॉलची पातळी आणि संपूर्ण हृदयाचे आरोग्य सुधारू शकते.
५. अक्रोड, बदाम, चिया बियांचे सेवन कोलेस्ट्रॉल कमी करू शकते.
६. मैदा, ब्रेड, बिस्कीट, तळलेले पदार्थ यांचे सेवन कमी प्रमाणात करावे.
Walk or Run चालणे की धावणे योग्य ?, नेमकं कशाने वजन होते कमी, जाणून घ्या…
७. कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी डाळी महत्वाची भूमिका बजावतात. उडीद, हरभरा डाळीच्या सेवनाने बॅड कोलेस्ट्रॉल कमी करता येते. मुगडाळ हृदय मजबूत बनविण्यासाठी मदत करते. शरीराला आवश्यक पोषक तत्वे देते.तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते.
मसूराच्या डाळीत प्रोटीन्स, मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, फोलेट, फायबर यांसारखे पोषक घटक आढळतात. यामुळे कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखर देखील नियंत्रित करण्यास मदत होते.